कराडच्या स्मशानभूमीत दहनासाठी ‘अग्निकाष्ट’चा वापर; अग्निकाष्ट सरण समिती व नगरपरिषदेचा पुढाकार
कराडच्या स्मशानभूमीत दहनासाठी ‘अग्निकाष्ट’ सर णा चा वापर; अग्निकाष्ट सरण समिती व नगरपरिषदेचा पुढाकार... कराड, दि. 30 (प्रतिनिधी) देशभरातील स्मशानभूमित दहनासाठी दररोज लाखो झाडांची कत्तल केली जाते.परिणामी पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.त्यामुळे पर्यावरणाच्या सवंर्धनासाठी माझी वसूंधरा अभियानाच्या माध्यमातून कराडच्या स्मशानभूमित पर्यावरण पूरक ‘अग्निकाष्ट’ सरणाची निर्मिती व वापर केला जाणार असल्याची माहिती अग्निकाष्ट सरण समितीने आज स्मशानभूमित पत्रकार परिषदेत दिली. माजी नगरसेवक विनायक पावसकर, सुधीर एकांडे, कांतीलाल जैन, सुरेश पटेल, महेंद्रकुमार शाह, विनायक विभुते हे यावेळी उपस्थित होते. अग्निकाष्ट’ सरणाबद्दल अधिक माहिती देताना माजी नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले, वृक्षतोडीबाबत समाज वेळीच सावध झाला नाही तर येणार्या पिढीला याचा त्रास सहन करावा लागणार आहे.त्यासाठी वृक्षतोडीला पर्याय म्हणून पाला-पाचोळा, उसाच्या चोयट्या, बगॅस व शेणापासून तयार केले आहे.संपूर्ण दहन प्रक्रिया झाल्यानंतर राख नदीत न टाकता त्या राखेचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो, अग्निकाष्ठ हे उपयुक्त सरपन दहनासाठ...