कराडात समस्त जैन संघाच्या वतीने मूक मोर्चा.....

कराडात समस्त जैन संघाच्या वतीने मूक मोर्चा.....

कराड दि.21 (प्रतिनिधी) झारखंड मधील श्री सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजीला या जैन धर्मियांयांच्या पवित्र क्षेत्रास झारखंड सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत परिपत्रक काढले असून यामुळे संपूर्ण जैन समाजाची भावना दुखावले आहेत. या क्षेत्राचे पूर्वीप्रमाणेच पावित्र्य आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात यावे व पर्यटन स्थळ रद्द करण्यात यावे यासाठी आज समस्त जैन संघाच्या वतीने कराडात मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अनादिकालापासून चालत आलेला जैन धर्म हा पुरातन आणि स्वतंत्र धर्म आहे. आपल्या या धर्मातील वर्तमान चोवीस तीर्थंकरापैकी वीस तीर्थंकर ज्या सिद्धक्षेत्रावरून मोक्षाला गेले, ते झारखंड मधील श्री सिद्धक्षेत्र सम्मेद शिखरजी अत्यंत पावन व पवित्र आहे. या क्षेत्रावर जैन समाजातील सर्वांची अत्यंत भक्ती आणि श्रद्धा असून या क्षेत्राच्या दर्शनार्थ लाखो श्रावक- श्राविका दरवर्षी यात्रा करीत असतात. झारखंड सरकारने अशा या जैन धर्माच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धक्षेत्र शिखरजिला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. यामुळे संपूर्ण जैन समाज अत्यंत दुखावलेला असून या क्षेत्राचे पूर्वीप्रमाणेच पावित्र्य आणि स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी आम्ही सर्वजण अहिंसक शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहोत.

याच अनुषंगाने आज रोजी बंदच्या आवाहनाद्वारे निवेदन करीत आहोत. सदरच्या निवेदनाद्वारे आमच्या तीर्थक्षेत्राची पवित्रता अबाधित राहावी, त्यासाठी आमच्या प्रती प्राचीन तीर्थाची झारखंड सरकारने घोषित केलेले पर्यटन स्थळ रद्द करण्यात यावे. तरी या आमच्या निवेदनाचा गांभीर्याने त्वरित विचार करण्यात यावा असेही या निवेदनात म्हटले आहे. 

कराड शहरातून आज सकाळी हा मुकमोर्चा रविवार पेठेतील जैन मंदिरापासून चावडी चौक, नेहरू चौक, आझाद चौक, मेन रोड ने दत्त चौक ते तहसीलदार कचेरी असा हा मोर्चा काढण्यात येऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.श्री राजस्थानी श्वे.मू.पू.संघ कराड व श्री संभवनाथ महाराज ट्रस्ट कराड,श्री दिंगबर जैन संघ,ओगलेवाडी जैन संघाचे सदस्य व जैन समाजीतील शेकडो नागरिक महिला या मोर्चात सहभागी झाले होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक