कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त
कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
कराड, दि. 19 - कराड शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या साडेचार लाखाच्या नऊ मोटरसायकली शहरातील लक्ष्मी नगर झोपडपट्टीतील दोघाकडून कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जप्त करून दोघांना ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गत काही महीन्यात कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतुन दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. सदरबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्हयांचा छडा लावण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व त्यांचे पथक कसोशीने सदर गुन्हयांचा तपास करीत होते. सदर गुन्हयाचे तपासदरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्हयांमधील दोन विधीसंघर्षित बालक आरोपी सनी महादेव चव्हाण रा. लक्ष्मीनगर झोपडपट्टी कराड यांना कराड गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी ताब्यात घेवुन सदर आरोपीत यांचेकडे कौशल्यपुर्व तपास केला असता नमुद आरोपीत यांनी कराड शहर परिसरातुन मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली असुन आरोपीत यांनी नमुद आरोपीत यांचेकडुन एकुण 4,50,000/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.

Comments
Post a Comment