कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर..
कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर... डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश; पुरवणी अर्थसंकल्पात झाली तरतूद... कराड, दि.17: कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ११ रस्ते हे अत्यंत महत्वाचे आणि दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असून, या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने जनतेची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात खास बाब म्हणून निधी मंजूर करावा, अशा मागणीचे पत्र डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीची दखल घेत वित्त विभागाने विधानमंडळास सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात संबंधित विकासकामांसाठी ३० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबई येथे प्