गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा :जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा....

 


कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच;जिल्ह्यात जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

कराड दि.15-(प्रतिनिधी) कोयना पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात निम्म पाणीसाठा कमी आहे गतवर्षी आजच्या दिवशी कोयना धरणात 48.95 टीएमसी पाणीसाठा होता तर आज याच धरणात 24.35 टीएमसी पाणीसाठा आहे.कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात 5 हजार 347 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. 

कोयना नवजा महाबळेश्वर या परिक्षेत्रात गतवर्षी जेवढा पाऊस पडला होता त्याच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस सध्या या तीन ठिकाणी पडल्याची नोंद झाली आहे.आज कोयना येथे 11, नवजा येथे 27 तर महाबळेश्वर येथे 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात सकाळी 8 वाजेपर्यंत 24.35 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 23.13 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात धरणात 1 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

कोयना धरण पाणीसाठा 

2022 रोजी एकूण पाणीसाठा-48.95 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा-43.83 टीएमसी, आजच्या दिवशी 2021 साली धरणात 46.62 टीएमसी पाणीसाठा होता.

Koyna Dam
Date: 15/07/2023
Time: 8:00 AM
Water level: 2065' 01" (629.437m) 
 
Dam Storage:
Gross: 24.35 TMC ( 23.13%)

Inflow: 5347  cusecs

Total Discharge 00 Cusecs

Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna: 11/944
Navaja: 27/1372
Mahabaleshwar:  22/1432

Comments

Karad Today News

कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल

कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच आहे.

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण

आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट

कराड शहरात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना वाढता पाठिंबा ; ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर...