मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

 


मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

कराड, दि. 21 - मलकापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्षपदाच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी ५२७७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. तेजस सोनवणे यांना एकूण १०,७४९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आर्यन कांबळे यांना ५४७२, तर शिवसेना शिंदे गटाचे अक्षय मोहिते यांना ७०४ मते मिळाली.

नगराध्यक्षपदासह नगर परिषदेच्या विविध प्रभागांतील निकाल जाहीर होताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निवडणुकीत अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या, तर काही प्रभाग बिनविरोध ठरले.

प्रभाग क्रमांक १ अ मध्ये भाजपाच्या अश्विनी शिंगाडे यांनी राष्ट्रवादीच्या कांचन लोहार यांचा २९८ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १ ब मध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे नितीन काशीद पाटील यांनी ३१९ मतांनी विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक २ अ मध्ये भाजपाच्या गीतांजली पाटील यांनी १२१ मतांनी विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक २ ब मध्ये अपक्ष उमेदवार भीमाशंकर माउर यांनी १०६ मतांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक ३ अ मध्ये भाजपाचे धनंजय येडगे ३१७ मतांनी विजयी झाले असून प्रभाग क्रमांक ३ ब बिनविरोध ठरला.

प्रभाग क्रमांक ४ अ बिनविरोध झाला, तर ४ ब मध्ये भाजपाच्या कल्पना रैनाक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा ४६ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये राष्ट्रवादीच्या मृणालिनी इंगवले यांनी १३५ मतांनी विजय मिळवला, तर ५ ब मध्ये राष्ट्रवादीचेच दादा शिंगण ४९ मतांनी विजयी ठरले.

प्रभाग क्रमांक ६ अ मध्ये भाजपाच्या सीमा सातपुते यांनी ६९० मतांनी दणदणीत विजय मिळवला, तर ६ ब मध्ये सुरज शेवाळे यांनी ८४७ मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ७ अ आणि ७ ब हे दोन्ही प्रभाग बिनविरोध ठरले.

प्रभाग क्रमांक ८ अ मध्ये भाजपाच्या गीता साठे यांनी ३६२ मतांनी विजय मिळवला, तर ८ ब मध्ये भाजपाचे शरद पवार यांनी ३८६ मतांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक ९ अ आणि ९ ब हे दोन्ही प्रभाग बिनविरोध ठरले.

प्रभाग क्रमांक १० अ मध्ये भाजपाचे प्रमोद शिंदे यांनी ६२४ मतांनी विजय मिळवला, तर १० ब मध्ये भाजपाच्या स्वाती थोरात यांनी ३५५ मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये भाजपाच्या राज्यश्री जगताप यांनी ३६२ मतांनी, तर ११ ब मध्ये भाजपाचे मनोहर शिंदे यांनी १६६ मतांनी विजय मिळवला.

या निवडणुकीच्या निकालातून मलकापूर नगर परिषदेवर भाजपाचा प्रभाव वाढल्याचे स्पष्ट झाले असून निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष केला.

1. एकूण निवडणूक आलेले सदस्य - अध्यक्ष 1 सदस्य 22

2. बिनविरोध निवडून आलेले सदस्य - 6

3. नगराध्यक्ष - भाजप 

3. पक्ष /आघाडी /अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या

- भाजप - 18

- शिवसेना - 0

- राष्ट्रवादी - 2

- राष्ट्रवादी (SP) - 0

- शिवसेना (UBT) - 1

- राष्ट्रीय काँग्रेस - 0

- स्थानिक आघाडी (असल्यास त्याचे नाव) - 0

- अपक्ष - 1


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक