अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबद्दल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्गदर्शन...

 


अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबद्दल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मार्गदर्शन...

कराड दि.13: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये असलेल्या शंका आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालया कडून देण्यात आली. सदर कार्यक्रम शनिवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महाविद्यालयाच्या YouTube चॅनेलवरून (https://www.youtube.com/@gcek) करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव ज. वाघ, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. लक्ष्मण ल. कुमारवाड, अधिष्ठाता तथा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. उमा श. पाटील, प्रवेश प्रक्रिया प्रभारी डॉ. कृष्णा आळसुंदकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या संधीचा प्रवेश इच्छुक विद्यार्थी आणि पालकानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल

कराडला सर्वात पुढे नेण्याची ताकद व कुवत आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यातच आहे.

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण

आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट

कराड शहरात आ. पृथ्वीराज चव्हाण यांना वाढता पाठिंबा ; ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत

कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर...