कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर..
कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर...
डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश; पुरवणी अर्थसंकल्पात झाली तरतूद...
कराड, दि.17: कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे, कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ११ रस्ते हे अत्यंत महत्वाचे आणि दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असून, या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने जनतेची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात खास बाब म्हणून निधी मंजूर करावा, अशा मागणीचे पत्र डॉ. भोसले यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. या मागणीची दखल घेत वित्त विभागाने विधानमंडळास सादर केलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात संबंधित विकासकामांसाठी ३० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबई येथे प्रारंभ झाला. या अधिवेशनात याबाबतची माहिती देण्यात आली.
यामध्ये रा. मा. ४ ते कालवडे – बेलवडे – कासारशिरंबे – साळशिरंबे रस्ता प्र.जि.मा. – ६२ कि.मी. ६/०० ते ११/००० (भाग बेलवडे बुद्रुक ते कासारशिरंबे) ची सुधारणा करणे व कि.मी. ८/८०० कासारशिरंबे गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे (२ कोटी ७५ लाख), रा. मा. १३६ ते तांबवे – डेळेवाडी – आंबवडे – कोळेवाडी – तुळसण – सवादे – उंडाळे – साळशिरंबे – जिंती रस्ता प्र.जि.मा. – ६३ कि.मी. ११/३०० ते २५/०० (भाग कोळेवाडी ते सवादे) ची सुधारणा करणे (७ कोटी), रा.मा. २६६ ई कार्वे ते कोडोली – शेरे – दुशेरे – रेठरे बुद्रुक इंजिन पाणंद – खुबी ते राज्यमार्ग १४८ रस्ता प्र.जि.मा. – ७१ कि.मी. १४/०० ते १९/५०० (भाग रेठरे खुर्द ते खुबी) ची सुधारणा करणे (५ कोटी ५० लाख), रा. मा. ४ ते कोयना वसाहत – जखिणवाडी – नांदलापूर – पाचवड फाटा – मुनावळे – कालेटेक – नारायणवाडी – आटके – जाधव मळा – ठोंबरे मळा – रेठरे बुद्रुक रस्ता प्र.जि.मा. – ८० कि.मी ८/०० ते १०/०० (भाग कालेटेक ते नारायणवाडी रा.मा. ४) ची सुधारणा करणे (१ कोटी ७५ लाख), राज्य मार्ग १३६ निसरे – मारुल – गुढे – बहुले – गुढे – काळगाव ते येळगाव रस्ता प्र.जि.मा. ५४ कि.मी. ४३/५०० ते ४५/३०० (भाग येळगाव ते रा.मा. १४४) ची सुधारणा करणे (१ कोटी ५० लाख), कासेगाव – बेलवडे – मालखेड – कार्वेकर वस्ती – रेठरे बुद्रुक रस्ता प्र.जि.मा. ७८ कि.मी. ३/९५० ते ५/०० (भाग बेलवडे बुद्रुक) ची सुधारणा करणे व आर.सी.सी. गटर बांधकाम करणे (१ कोटी ५० लाख), शेणोली रेल्वेस्टेशन शिरसगाव ते तालुका हद्द रस्ता प्र.जि.मा. – ६४ कि.मी. ०/०० ते २/००० (भाग स्टेशन ते संजयनगर) ची सुधारणा करणे (२ कोटी २५ लाख), उंडाळे – शेवाळवाडी – पाटीलवाडी – येळगाव – शेवाळवाडी ते रा.मा. १४४ ते येणपे – गिरजावडे रस्ता प्र.जि.मा. ७२ कि.मी. ४/१०० ते ६/०० (भाग बांदेकरवाडी ते म्हासोली रस्ता) ची सुधारणा करणे (२ कोटी ३० लाख), रा.मा. १३६ ते तांबवे – डेळेवाडी – आंबवडे – कोळेवाडी – तुळसण – सवादे – उंडाळे – साळशिरंबे – जिंती रस्ता प्र.जि.मा. ६३ कि.मी. २५/०० ते २९/०० (भाग साळशिरंबे ते म्हासोली रस्ता) ची सुधारणा करणे (२ कोटी २० लाख), रा.म.मा. ४ ते कोयना वसाहत – जखिणवाडी – नांदलापूर – पाचवड फाटा – मुनावळे – कालेटेके - नारायणवाडी – आटके – जाधव मळा – ठोंबरे मळा – रेठरे बुद्रुक रस्ता प्र.जि.मा. ८० कि.मी. ०/०० ते ३/२०० (भाग कोयना वसाहत ते नांदलापूर) मध्ये कोयना वसाहत – जखिणवाडी – नांदलापूर गाव हद्दीत आर.सी.सी. गटर बांधकाम करणे (१ कोटी), रा.मा. ४ ते वराडे – भोळेवाडी – रा.मा. १३६ ते साकुर्डी – तांबवे – सुपने – जुने पाडळी – गावठाण ते वारुंजी ते रा.मा. १३६ रस्ता प्र.जि.मा. ७९ कि.मी. २१/५०० ते २५/००० (भाग केसे ते वारुंजी) ची सुधारणा करणे (२ कोटी २५ लाख) रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे आणि डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील या विकासकामांसाठी मोठ्या निधीची तरतूद पुरवणी अर्थसंकल्पात झाल्याने, यामुळे कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांची कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. तसेच या कामांमुळे ग्रामीण दळणवळणाला अधिक चालना मिळणार आहे. या विकासकामांना लवकरच प्रारंभ केला जाणार असून, याबद्दल जनतेकडून राज्य शासनाचे आभार मानले जात आहेत.
Comments
Post a Comment