श्री खंडोबा यात्रे निमित्त जिल्हा पोलिस प्रशासनाची नियमावली जाहीर....

 


श्री खंडोबा यात्रे निमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू...

सातारा दि. 23 : पाल ता. कराड येथे श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा दि.3 जानेवारी ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत साजरी होणार आहे. यात्रा कालावधीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधनियम 1951 चे कलम 36 नुसार असलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्याहून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना 3 जानेवारी ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून वाहनांच्या नियमासंदर्भात व यात्रेच्या अनुषंगाने व्यक्तींचे वर्तन असावे, ध्वनी प्रदुषणानच्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

पाल यात्रेनिमित्त मानकऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन...

पाल ता. कराड या ठिकाणी 3 जानेवारी ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 प्रमाणे पाल यात्रेतील मानकारी यांच्या मानाचे बैलगाडी अटी व शर्थी संबंधाचे आदेश 5 जानेवारीच्या सकाळी 8 ते 6 जानेवारी 2023 च्या सकाळी 6 पर्यंत आदेश जारी केले आहेत.

मानकरी यांच्या मानाच्या बैलगाडीबाबत अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. यात्रेत सामलिक होणाऱ्या बैलगाडीवान यांनी गाडी ओढणाऱ्या बैलांना वेसन घातलेली असावी. तसेच नेहमी जुंपण्यात येणाऱ्या व माणसाळलेल्या बैलांचाच वापर करावा. प्रत्येक गाडीत 5 पेक्षा जास्त लोकांनी बसू नये. मिरवणुकीच्यावेळी दोन्ही बैलगाड्यामध्ये सुरक्षित अंतर असावे. प्रत्येक गाडीमालकाने आपल्या गाडीपासून इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

दि. 5 जानेवारी 2023 रोजी मुख्य मिरवणुकीकरिता 8 वाजता सर्व मानकरी यांनी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप घेवून श्री बाबासाहेब इंजोजीराव पाटील रा. पाल. ता. कराड यांच्या वाड्यासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. मुख्य मिरवणुकीतील वाहनांची व जनावरांची तपासणी संबंधित तज्ञांकडून करवून घ्यावी व मिरवणुकीच्या वापरास योग्य आहेत याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे.

दि.5 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी श्री खंडोबा देवाचा लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्व मानकरी आपआपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप घेवून त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी जावे. दि. 6 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजता रितीरिवाजाप्रमाणे मानकरी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप बोहल्याच्या ठिकाणी मानाप्रमाणे उभ्या कराव्यात. तेथून देवाची मूर्ती पालखीतून मंदिरात जाण्यासाठी मिरवणुकीने निघताच सर्व मानकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप मिरवणुकीच्या मार्गाने खंडोबा देवाच्या मंदिरात 6 वाजेपर्यंत आणाव्यात. देवाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवल्यानंतर सर्वांनी आपआपल्या गाड्या घेवून जाव्यात.

ज्या मानकऱ्यांची वरील प्रमाणे वागण्याची इच्छा नाही त्यानी आपल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप मिरवणुकीमध्ये आणू नयेत. मिरवणुकीतील मानकारी बैलगाड्या, ट्रॅक्टर, जिप चालक यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाईस पात्र राहतील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

पाल यात्रेनिमित्त मानकऱ्यांच्या घोड्याबाबत अटी व शर्ती पालन करण्याचे आवाहन...

पाल यात्रेतील मानकारी यांच्या घोड्यांच्याबाबतचे अटी व शर्थी संबंधाचे आदेश 5 जानेवारीच्या सकाळी 8 ते 6 जानेवारी 2023 च्या सकाळी 6 पर्यंत आदेश जारी केले आहेत.

अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. यात्रेच्या मुख्य दिवशीच्या मिरवणुकीमध्ये सामिल होणाऱ्या मानाच्या घोड्यास लगाम घातलेला असावा. मिरवणुकीमध्ये माणसाळलेल्या, शिकावू घोड्याचाच वापर करावा. इतर भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. 5 जानेवारी 2023 रोजी मुख्य मिरवणुकीकरिता सकाळी 8 वाजता मानकरी श्री. बाबासाहेब इंजोजीराव पाटील रा. पाल. ता. कराड यांच्या वाड्यासमोर जमावे व आपले मानाप्रमाणे उभे रहावे. दुपारी 2 वाजता श्री. महिपती शंकरराव पवार रा. शिवणी ता. खानापूर यांच्या बैलगाडीतून देव देवळातून मंडपातून मंडपाबाहेर आणल्यानंतर तेथून देवाची मिरवणुक मानकरी श्री. देवराज पाटील रा. पाल यांच्यासमवेत मिरवणुकीने निघावे. यावेळी मानाचा घोडा व चोपदार यांनी मिरवणुकीपुढे रहावे. सायं. 6 वाजता देवाच्या लग्नाचा सोळहा संपन्न झाल्यानंतर मानकरी आपला घोडा आपले मुक्कमाच्या ठिकाणी घेवून जातील.

मुख्य मिरवणुकीतील घोड्याची तपासणी संबंधित पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करावी व मिरवणुकीस वापरण्यास योग्य आहे याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे. मानकरी यांनी वरील प्रमाणे अटी व शर्ती मान्य नसतील तर त्यांनी आपले घोडे मिरवणुकीमध्ये आणू नयेत. मिरवणुकीतील मानकरी यांचे घोड्याचे चालक यांना अटी व शर्तीप्रमाणे वागण्यांचे बंधन राहील.

वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाईस पात्र राहतील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक