कराडात लसीकरणासाठी नागरिकांचे रूग्णालयात हेलपाटे;काॅटेज, नागरी आरोग्य केंद्रात लसच नाही...
कराडात लसीकरणासाठी नागरिकांचे रूग्णालयात हेलपाटे;काॅटेज, नागरी आरोग्य केंद्रात लसच नाही...
कराड दि.28-(प्रतिनिधी) कोरोना संसर्गाची पुन्हा चर्चा सुरू झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. तर ज्यांनी लसीकरण केले नाही असे नागरिक स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्र कराड या ठिकाणी लसीबाबत विचारणा करीत आहेत. मात्र या दोन्ही ठिकाणी लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात सूमारे 75 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागरिकांनी लसीकरणाचा पहिला व दूसरा डोस घेतला. मात्र त्यानंतर कोरोनाचा कहर ओसरल्यानंतर अनेकांनी बूस्टर डोस कडे पाठ फिरवली होती. आता पुन्हा कोरोनाच्या चौथ्या लाठेची शक्यता वर्तवली जात असून त्या अनुषंगाने काल देशभरात कोरोना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देशभरात मॉक ड्रील घेण्यात आला. या लाटेत कोरोनाचा नविन व्हेरिएंट असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे देशभरात कोरोनाच्या चौथ्या लाठीची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू केल्याचे दिसून येते.
सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही भिती बाळगू नये,तसेच प्रशासनाच्या ज्या नियमावली असतील त्याचे पालन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment