कृष्णा दंतविज्ञान महाविद्यालयातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांची दंततपासणी....
कृष्णा दंतविज्ञान महाविद्यालयातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांची दंततपासणी....
कराड,दि.27 : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या दंतविज्ञान अधिविभागातर्फे कोल्हापूर येथील जिज्ञासा विकास मंदिरमध्ये शिकणाऱ्या बौद्धिक अक्षम असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नुकतेच दंततपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य साधनांचे वाटप करण्यात आले.
दातांच्या आरोग्याबाबत शालेय मुलांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या दंतविज्ञान अधिविभागामार्फत अनेक उपक्रम राबिवले जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिज्ञासा विकास मंदिर या शाळेत दिव्यांग मुलांसाठी दंततपासणी शिबीर घेण्यात आले. याठिकाणी प्राचार्य डॉ. शशिकिरण एन. डी. व त्यांच्या टीमने विशेष मुलांची दंततपासणी करत, त्यांना व शाळेतील शिक्षकांना मौखिक आरोग्याचे महत्व समजावून सांगितले. यावेळी मुलांसाठी काही मजेशीर खेळही घेण्यात आले. तसेच दंतआरोग्याचे महत्व समजावून सांगणाऱ्या नाटिकेचे सादरीकरणही करण्यात आले.

Comments
Post a Comment