कराडात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदीला अभियान’ कार्यक्रमाचा समारोप.......
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदीला अभियान’ कार्यक्रमाचा कराडात समारोप...
कराड दि. 29 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘चला जाणुया नदीला अभियान’ कार्यक्रमाचा समारोप दि. 30 डिसेंबर 2022 रोजी ‘चला जाणुया नदीला अभियान’ जिल्हास्तरीय समिती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड व कराड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. सुमंत पांडे व नरेंद्र चौघ यांच्या प्रमुख उपस्थित सकाळी 10.15 ते 12.30 वा. कोयना-कृष्णा प्रितिसंगम येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमापूर्वी सकाळी 8.30 ते 10 या वेळेत "लोक सहभागातून प्लास्टिक घन कचऱ्याचे विकेंद्रीत व्यवस्थापन" या विषयी सागर मित्र विनोद बोधनकर व " नदी पुनर्विकास आणि संवर्धन" या विषयी प्रा. अमरसिंह लांडगे यांचे व्याख्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे आयोजित करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संजय डोईफोडे अधिक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment