दुकाने व संस्था निरीक्षक प्रशांत पाटील यांची कराडात कामगार कार्यालयास भेट...
दुकाने व संस्था निरीक्षक व इमारत कामगार नोंदणी अधिकारी प्रशांत पाटील यांची कराडात कामगार कार्यालयास भेट...
कराड दि.24 (प्रतिनिधी) येथील नवनिर्वाचित अधिकारी प्रशांत पाटील (दुकाने व संस्था निरीक्षक व इमारत कामगार नोंदणी अधिकारी) व त्यांचे सहकारी स्वप्निल बडेकर यांनी लोकधारा कामगार नोंदणी कार्यालयास भेट दिली. यावेळी कामगार नेते कॉम्रेड भानुदास मधुकर वास्के यांनी त्यांचे स्वागत केले व कराड शहर व तालुक्यातील कामगारांच्या समस्या तसेच नोंदणी मध्ये येणाऱ्या अडचणी सांगून नोंदणीकृत कामगारांचा मेळावा घेऊन त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्याची मागणी केली.
दुकाने व संस्था निरीक्षक व इमारत कामगार नोंदणी अधिकारी प्रशांत पाटील यांनी कामगारांनी आपली नोंदणी वेळेत करून घ्यावी असे आवाहन केले.तसेच सर्व कामगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. आपआपले काम करत असताना आपल्या सोबत असलेल्या कामगारांची नोंदणी वेळेत करुन सहकार्य करावे असे आव्हान करुन कराडात कामगारांना केलेल्या सत्काराप्रती आभार मानले.
यावेळी अर्जुन वास्के, आकाश अरबुणे, सुनील पाटील (अध्यक्ष महाराज साहेब प्रतिष्ठान वाठार), विनायक गायकवाडसर, महेश जाधव (हजारमाची), व कराड शहर व तालुक्यातील कामगार व प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Post a Comment