कराडात पूर्वीचा वाद उपाळला; आझाद चौकात एकावर चौघांकडून शस्त्राने वार...


कराडात पूर्वीचा वाद उपाळला; आझाद चौकात एकावर चौघांकडून शस्त्राने वार...

कराड, दि. 25 प्रतिनिधी) येथील आझाद चौकात पूर्वीच्या वादातून चौघांनी एकावर शस्त्राने वार करुन जीव घेणा हल्ला केल्याची घटना काल रात्री उशिरा घडली असून पोलिसांनी एकास अटक केली आहे.मात्र अन्य तिघे फरार झाले आहेत.फरार झालेल्या तिघांपैकी एक जणावर पिस्तूल बाळगल्याच्या आरोपाखाली अटक ही झाली होती. शंकर नलवडे हा ह्ल्यात जबर जखमी असून रोहित तडख हा एकटाच पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

कराडच्या आझाद चौकात काल रात्री साडे दहा वाजता शंकर भानुदास नलवडे (वय 29 रा. भोई गल्ली) याच्यावर पूर्वीच्या वादावरुन चौघांनी घातक शस्त्राने हल्ला केला.याप्रकरणी पोलिसांनी आझाद चौकातीलच रोहित तडख यास अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य तीन जण फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

शंकर भानुदास नलवडे (वय 29 रा. भोईगल्ली, आझाद चौक) असे हल्ला झालेल्या जखमी युवकाचे नाव असून आझाद चौकातील भोई गल्लीत राहणारे विनोद तडख, रोहित तडख, यश पाटील, पंकज पाटील या चौघांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.यापैकी रोहित तडख याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नूसार जखमी शंकर नलवडे व संशयित आरोपी यांचा नवरात्र उत्सव काळात मिरवणूकीत नाचण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात ठेवून काल रात्री विनोद तडख, रोहित तडख, यश पाटील व पंकज पाटील या चौघांनी शंकर नलवडे याच्यावर धारदार शस्त्रांनी पोटावर, डोक्यात व छातीवर वार केले. यामध्ये शंकर गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी पोलिसांनी चौघांपैकी रोहित तडख यास ताब्यात घेतले.अधिक चौकशी दरम्यान अन्य तिघांची नावे निष्पन्न झाली. मात्र ते तिघे फरार होण्यात सफल झाली. या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली असून पूढील तपास पो. उपनिरीक्षक राजू डांगे हे करीत आहेत.

.....तर घटना टळली असती...

काल रात्री झालेल्या जीवघेण्या हल्यात ज्या चौघांनी सहभाग घेतला त्यातील पंकज पाटील यास काही दिवसांपूर्वी पिस्तूल बाळगून परिसरात दहशत माजवण्याच्या प्रकरणात कराड पोलिसांनी पिस्तूलसह अटक केली होती.मात्र त्याची तात्काळ सूटका ही झाली होती.अशा गून्ह्यांत पोलिसांनी सांभाव्य घटनांचा विचार करून कडक शासन केले असते तर हल्ल्यासारख्य घटना घडल्या नसत्या अशी चर्चा आता शहरात सूरू झाली आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक