कराड तालुक्यात काॅंग्रेसची बाजी;राष्ट्रवादी दूसर्‍या तर भाजप तिसर्‍या स्थानी;नऊ ग्रामपंचायती मध्ये सत्तांतर....

कराड तालुक्यात काॅंग्रेसची बाजी;राष्ट्रवादी दूसर्‍या तर भाजप तिसर्‍या स्थानी;नऊ ग्रामपंचायती मध्ये सत्तांतर....

कराड दि.20 (प्रतिनिधी)  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी नंतर तालुक्यातील वडगाव हवेली, आटके, तळबीड सूपने, आणे, किवळ, जुने कवठे, कोरेगाव व पाडळी हेळगाव या ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले आहे. तारुख व चोरजवाडी येथे अपक्षांना सरपंच पदाची लॉटरी लागली असून रेठरे खुर्द येथे सिंह आला पण गड गेला अशी अवस्था झाली आहे. तालुक्यात काही ठिकाणी आ.पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी आपली सत्ता कायम राखली आहे. तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीमध्ये 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असुन 33 ग्रामपंचायतींची आज मतमोजणी पार पडली. या संपुर्ण निवडणूकीत काँग्रेस अव्वल राहिली असून दुसऱ्या स्थानी राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली असून भाजपा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.

दरम्यान कराड तालुक्यात महाविकास आघाडीने स्थानिक गटाच्या माध्यमातून बाजी मारली असून भाजप-शिंदे गटाची निराशा झाल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गट ही या निवडणुकीत कुठेही दिसला नाही.44 पैकी 15 हुन अधिक ग्रामपंचायतीमध्ये काॅंग्रेसच्या गटाने बाजी मारत आ.पृथ्वीराज चव्हाण व यूवा नेते अॅड.उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाने विजय संपादन केला आहे. 

तालुक्यातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये वडगाव हवेली कृष्णाचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी दहा जागा जिंकत सत्ता ताब्यात घेतली आहे तर आटके येथे भाजपा दक्षिण तालुका अध्यक्ष पै धनाजी पाटील यांना पराभवाचा झटका बसला असून या ठिकाणी महाविकास आघाडीने भोसले गटाच्या मदतीने सत्तांतर घडविले आहे. रेठरे खुर्द मध्ये चव्हाण गटाला सरपंच पद व दोन जागांवर समाधान मानावे लागले तर या ठिकाणी अविनाश मोहिते गटाला सहा जागा व भोसले गटाला तीन जागा मिळाल्या आहेत. तळबीड येथे आ. बाळासाहेब गटाला पराभवाचा धक्का बसला असून आ.पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील गटाने सत्तांतर घडवली आहे.

सुपने ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासह आठ जागा जिंकत राष्ट्रवादीच्या गटाने सत्ता काबीज केली आहे. आणे मध्ये डॉ. अतुल भोसले गटाने सरपंच पदासह सहा जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली असून या ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. किवळ ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीच्या गटाने सत्तांतर घडवले असून काँग्रेसचा या ठिकाणी मोठा पराभव झाला आहे तर जुने कवठे येथे बऱ्याच वर्षानंतर काँग्रेसच्या गटाने बाजी मारत सत्तांतर घडवली असून राष्ट्रवादीच्या गटाला केवळ तीन जागांवर येथे समाधान मानावे लागले आहे.

कोरेगाव येथे आ. बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले गटाने बाजी मारत सत्तांतर घडवली आहे. सरपंच पदाचा आठ जागा जिंकल्या असून आहेत. पाडळी हेळगाव मध्ये राष्ट्रवादीच्या गटाने सत्तांतर मिळवले आहे. तर बहुतांशी ठिकाणी स्थानिक गटाने आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत मधील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.

चूकीच्या ठिकाणी मतमोजणी;शहरातील वाहतुक काही काळ विस्कळीत...

कराड शहरात मतमोजणी असल्याने वाहतुकीत केलेल्या तात्पुरत्या बदलामुळे वाहन चालकासह नागरिकांची नागरिकांना मोठ्या गैरसोयीला आज सामोरे जावे लागले. प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयात मतमोजणी ठेवल्याने सकाळपासूनच शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची एकाच मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाच्या या चुकीच्या नियोजनाचा फटका वाहन चालकांना चांगलाच बसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र संबंधित प्रशासनाच्या ही बाब उशिरा लक्षात आल्याने बंद करण्यात आलेले मार्ग खुले केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक