कराड शहरात गोवरचा रूग्ण आढळला, नागरी आरोग्य केंद्रांकडून गोवर लसीकरण पूर्ण...
कराड शहरात गोवरचा रूग्ण आढळला, नागरी आरोग्य केंद्रांकडून गोवर लसीकरण पूर्ण...
कराड दि.28 (प्रतिनिधी) कराड शहरात गोवर बाधित रुग्ण सापडला असून कराड नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून त्या बालक रुग्णांवर यशस्वी उपचार पूर्ण झाले असून तो सध्या नाॅर्मल आहे. रुग्ण सापडला त्या परिसरात गोवरचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नागरी आरोग्य केंद्राच्या डाॅ. शितल कुलकर्णी यांनी दिली तसेच कराड शहरात विविध ठिकाणी गोवर लसीकरण मोहिम राबवून सर्व लसीकरण पूर्ण केले असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात गोवर रा संसर्गजन्य साथीचा फैलाव झाल्यानंतर राज्य शासनाने तातडीने सतर्कता बाळगत संपूर्ण महाराष्ट्रात गोवर सात आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न केले. गोवरचे लसीकरण ही सुरू करण्यात आले. सुरुवातीला या गोवर साथीचा प्रादुर्भाव मराठवाडा विदर्भात तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात पसरला होता त्या पार्श्वभूमीवर तातडीने लसीकरण करण्यात आल्याने ही साथ आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
कराड शहरात कराड नगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून डाॅ. शितल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका यांनी आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने शहरातील शून्य ते पाच वयोगटातील लहान मुलांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण केले आहे. गत आठवड्यात लसीकरण दरम्यान मूजावर काॅलनी बारा डबरे परिसरात एका बालकास तपासणी प्रसंगी गोवरची लक्षणे दिल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.यामध्ये सबंधित बालकास गोवरचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला मात्र लक्षणे साधारण असल्यामुळे व लसीकरणासह त्याच्यावर उपचार सुरू केल्याने तो सध्या पूर्ण बरा झाला आहे.
गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो. अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणं या आजाराची प्रमुख लक्षणं मानली जातात. सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात. तसंच डोळे लाल होऊ शकतात. बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. यापैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास तातडीने रूग्णालयात जावे असे आवाहन कराड नगरपरिषद, नागरी आरोग्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment