कृष्णा कारखान्याचा सी.एन.जी. पंप कार्यान्वित; साखर कारखाना संचलित जिल्ह्यातील पहिला सी.एन.जी. पंप; लोकांना होणार लाभ...

 


कृष्णा कारखान्याचा सी.एन.जी. पंप कार्यान्वित; साखर कारखाना संचलित जिल्ह्यातील पहिला सी.एन.जी. पंप; लोकांना होणार लाभ...

रेठरे बुद्रुक, दि.29 : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित सी.एन.जी पंपाचे उद्‌घाटन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात झाले. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेला हा जिल्ह्यातील पहिलाच सी.एन.जी. पंप असून, या पंपामुळे परिसरातील लोकांची मोठी सोय होणार आहे.

कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, वैभव जाखले, संजय पवार, सेक्रेटरी मुकेश पवार, टेक्निकल को-ऑर्डिनेटर एस. डी. कुलकर्णी, स्टोअर ऑफिसर गोविंद मोहिते, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, सी.एन.जी. तंत्रज्ञ अक्षय यादव आदी उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, देशात नैसर्गिक वायू इंधन देण्याचे नियोजित करण्यात आले असून, त्याअंतर्गत प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यासाठी देशभरात विविध ठिकाणी इंधनासाठी नैसर्गिक वायूचा वापर केला जाणार आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्याने सी.एन.जी. पंप कार्यान्वित केला असून, लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे.

ऊस शेती हा ऊर्जेचा निरंतर स्तोत्र आहे. लोकांना लागणारी ऊर्जा आता आपण ऊसशेतीच्या माध्यमातून निर्माण करत आहोत. सोलर एनर्जीचाही वापर वाढविला पाहिजे. येत्या काळात इथेनॉल निर्मितीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी म्हणाले, सी.एन.जी. हा इंधनप्रकार स्वच्छ आणि सुरक्षित असून इतर इंधन प्रकाराच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आहे. सी.एन.जी., इथेनॉल यासारखी इंधने मोठ्याप्रमाणात निर्माण केली जात असून, भविष्यात या इंधनांना मोठी मागणी असणार आहे. मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

याप्रसंगी आंतरविद्यापीठीय शरीरसौष्ठव, कुस्ती, वेटलिफ्टिंग, फुटबॉल व मैदानी स्पर्धेतील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ऊस वाहतूकदारांना होणार लाभ

कृष्णा कारखाना शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व ऊस वाहतूकदार यांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी घेत असतो. त्यानुसार सी.एन.जी. वापरून ऊसवाहतूक खर्चात बचत करण्याचे धोरण लवकरच कारखाना राबविणार असल्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी सांगितले.

रेठरे बुद्रुक : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित सी.एन.जी पंपाच्या उद्‌घाटनप्रसंगी चेअरमन डॉ. सुरेश भोसले. बाजूस व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व संचालक मंडळ.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक