माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांचा नागपूर मेट्रो मधून प्रवास...

 


माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांचा नागपूर मेट्रो मधून प्रवास... 

तिकीट खरेदी करून केली सफर- प्रकल्पचे केले कौतुक....

नागपूर : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी तिकीट खरेदी करून नागपूर मेट्रो मधून प्रवास केला. त्यांनी यावेळी मेट्रो प्रकल्पचे कौतुक करीत नागपूरने आंतरराष्ट्रीय शहराकडे झेप घेतल्याचे यावेळी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळात पुणे व नागपूर मेट्रो ची पायाभरणी केली होती. त्यानुसार त्यांनी निधी मंजूर केला होता. यावर्षी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले आ. चव्हाण यांनी महाराष्ट्र मेट्रो च्या मेट्रो भवन कार्यालयास भेट दिली व मेट्रो मधून प्रवासहि केला. 

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर शहरातील सीताबर्डी ते शंकरनगर असा मेट्रो मधून प्रवास केला. तत्पूर्वी त्यांनी मेट्रोच्या मुख्यालयास भेट दिली. येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ दीक्षित यांनी आ. चव्हाण यांना नागपूर व पुणे मेट्रो ची माहिती दिली. वर्धा मार्गांवरील डबल डेकर पूल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये समाविष्ट झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आ. चव्हाण यांनी व्हिजिटर बुक मध्ये नागपूर मेट्रो प्रकल्पचे डिझाईन सुंदर असून शहर आंतरराष्ट्रीय दिशेने पुढे जात असल्याचे नोंद केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री राजेंद्र मुळक तसेच महामेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक उदय बोरवणकर उपस्थित होते.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक