कराडच्या स्मशानभूमीत दहनासाठी ‘अग्निकाष्ट’चा वापर; अग्निकाष्ट सरण समिती व नगरपरिषदेचा पुढाकार


कराडच्या स्मशानभूमीत दहनासाठी ‘अग्निकाष्ट’ सरणाचा वापर; अग्निकाष्ट सरण समिती व नगरपरिषदेचा पुढाकार... 

कराड, दि. 30 (प्रतिनिधी)  देशभरातील स्मशानभूमित दहनासाठी दररोज लाखो झाडांची कत्तल केली जाते.परिणामी पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे.त्यामुळे पर्यावरणाच्या सवंर्धनासाठी माझी वसूंधरा अभियानाच्या माध्यमातून कराडच्या स्मशानभूमित पर्यावरण पूरक ‘अग्निकाष्ट’ सरणाची निर्मिती व वापर केला जाणार असल्याची माहिती अग्निकाष्ट सरण समितीने आज स्मशानभूमित पत्रकार परिषदेत दिली. माजी नगरसेवक विनायक पावसकर, सुधीर एकांडे, कांतीलाल जैन, सुरेश पटेल, महेंद्रकुमार शाह, विनायक विभुते हे यावेळी उपस्थित होते.

अग्निकाष्ट’ सरणाबद्दल अधिक माहिती देताना माजी नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले, वृक्षतोडीबाबत समाज वेळीच सावध झाला नाही तर येणार्‍या पिढीला याचा त्रास सहन करावा लागणार आहे.त्यासाठी वृक्षतोडीला पर्याय म्हणून पाला-पाचोळा, उसाच्या चोयट्या, बगॅस व शेणापासून तयार केले आहे.संपूर्ण दहन प्रक्रिया झाल्यानंतर राख नदीत न टाकता त्या राखेचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो,

अग्निकाष्ठ हे उपयुक्त सरपन दहनासाठी अग्निकाष्ठ सरण समितीने उद्योजक कांतीलाल रतनचंद जैन यांनी त्यांची मुलगी स्व. सौ. रिना प्रितम शहा (अहमदाबाद) हिच्या स्मृति प्रित्यर्थ सर्व कराडकरांसाठी उपलब्ध केले आहे. या सरणाच्या वापराने बेसुमार वृक्षतोडीला आळा बसेलच व पर्यावरणाचे रक्षण होईल. तसेच या सरपणाची ज्वलनशीलता व त्यातून निर्माण होणारी उष्णता ही लाकडापेक्षा जास्त आहे. त्यामुळे केवळ 200 किलो अग्निकाष्ठमधे मृत देहाचे दहन होते. यामुळे सरपणासाठी होणारा सुमारे दोन-अडीच हजार रुपये खर्च फक्त एक हजारात होणे शक्य आहे.

समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विनामुल्य सरण उपलब्ध करुन देत असल्याचे सांगून पावसकर म्हणाले कराडात होत असलेला पर्यावरण रक्षणाचा हा प्रयोग प. महाराष्ट्रात प्रथमच होत आहे. तसेच तो केंद्र सरकारच्या ‘वसुंधरा बचाव’ उपक्रमाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.त्यामुळे दहन करताना अग्निकाष्ठ सरणाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहनही नगरपालिका व समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक