कराडात मुथूट फिनकाॅर्प मध्ये ख्रिसमस निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम...
कराडात मुथूट फिनकाॅर्प मध्ये ख्रिसमस निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम...
कराड दि.24 (प्रतिनिधी) ख्रिसमस नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो.हा सण सर्वांच्या जीवनात सूख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येतो. याच निमित्तिने मुथूट फिनकाॅर्प लिमिटेडच्या कराड शाखेत खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास महिलांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.
मुथूट फिनकाॅर्पच्या शाखेत ख्रिसमस निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम आज संपन्न झाला. यानिमित्तिने आयोजित कार्यक्रमात ख्रिसमसचे औचत्य साधून शाखेच्या वतीने ग्राहक व महिलांसाठी देण्यात येणार्या सेवा सूविधां बाबत शाखाधिकारी जास्मिन काझी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करुन मुथूटच्या सेवा-सूविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करुन सोने खरेदी व त्यावरील लोनबाबतच्या अनेक योजनांबाबतची माहिती दिली. यावेळी मुथूट फिनकाॅर्पच्या विविध योजनांची माहितीपर पाॅम्पलेटचे वाटप ही करण्यात आले.
मुथूट फिनकाॅर्पच्या कराड शाखेतर्फे ख्रिसमसनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांचे शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वागत केले. तसेच मुथुट फिनकाॅर्पच्या उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सूविधांबाबत शाखेच्या आधिकार्यांनी महिलांना मार्गदर्शन करुन माहिती दिली. मुथूटच्यावतीने दिली जाणारी सेवा तसेच वर्षभर सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दलची माहिती ही यावेळी देण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुथूट फिनकॉर्प लिमिटेडच्या कराड शाखा प्रमुख जास्मिन काझी, शाखेतील कर्मचारी आशिकेश मोरे, कल्याणी माने, संदीप नलवडे यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment