यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यात ३ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन....
रेठरे बुद्रुक : कृष्णा सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ३ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन करताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ.अतुल भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप व मान्यवर संचालक...
कृष्णा कारखान्यात ३ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन....
रेठरे बुद्रुक, ता. २४ : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२०२३ या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ३ लाख १ व्या साखर पोत्याचे पूजन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, गुणवंतराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, कोरेगावचे सरपंच बाळासाहेब पाटील, शेणोलीचे सरपंच जयवंत कणसे, गजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी गळीत हंगामात उत्पादित झालेल्या साखर पोत्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी मुकेश पवार, टेक्निकल को- ऑर्डीनेटर एस डी. कुलकर्णी, संजय पवार, एम के कापूरकर, वसंतराव पवार, उमेश शिंदे, हेमंत धर्मे, प्रशांत मोहिते, सुनील कणसे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment