बेलवडे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांना अभिवादन...
बेलवडे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांना अभिवादन...
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांचे तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान- हर्षवर्धन मोहिते...
कराड दि.22-कराड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक व आरोग्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवनारे आपल्या परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांची आज 98 वी जयंती बेलवडे येथे साजरी करण्यात आली.
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असुन कृष्णा कारखाना व कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातुन स्व. आप्पांनी तालुक्यातील भरीव काम केले असुन सामाजिक बांधिलकीतून लाखो रूग्णांची सेवा ही केली असल्याची भावना कृष्णा सहकारी बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते यांनी व्यक्त केली. यावेळी बेलवडे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी कालवडे-बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे उपाध्यक्ष जगन्नाथ मोहिते, ग्रामपंचायत सदस्य जयवंतराव मोहिते, मारुती मोहिते(आबा), राजाराम मोहिते (पापा), रुपेश मोहिते, सदस्य संजय मोहिते, आनंदराव मोहिते, महेंद्र कांबळे, जयवंत मोहिते, उद्योजक प्रशांत मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश मोहिते, गणेश जाधव, रायसिंग मोहिते, रतनसिंह मोहिते, पराग माने, बाजीराव साळुंखे अजित मोरे यांची उपस्थिती होती.

Comments
Post a Comment