सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन....
सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना जयंतीदिनी मान्यवरांकडून अभिवादन....
कराड, दि.22 : कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या पवित्र स्मृतींना ९८ व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, पृथ्वीराज भोसले, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, आदित्य मोहिते यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव थोरात, जयवंतराव जगताप, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील, श्रीरंग देसाई, सयाजी यादव, धोंडिराम जाधव, शिवाजी पाटील, ब्रिजराज मोहिते, बाबासो शिंदे, दिपक पाटील, दत्तात्रय देसाई, माजी संचालक पांडुरंग होनमाने, सुजीत मोरे, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, ॲड. बी. डी. पाटील, माजी सभापती सुनील पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक संग्राम पाटील, प्रदीप साळुंखे, सर्जेराव पाटील, राहूल पाटील, कालवडेचे उपसरपंच शुभम थोरात, गणपतराव साळुंखे, ज्ञानू जाधव, शिवाजीराव दमामे, प्रसाद पाटील, कृष्णत जगताप, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. सारिका गावडे, डॉ. सुशील सावंत, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट चारुदत्त देशपांडे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, कृष्णा बँकेचे संचालक रणजीत लाड, प्रदीप थोरात, सौ. सारिका पवार, माजी संचालक महादेव पवार, तातोबा थोरात, किल्ले मच्छिंद्रगडच्या सरपंच वैशाली साळुंखे, सुरेश पाटील, आण्णासो काशीद, संतोष हिंगसे, आनंदराव जमाले, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, प्रमोद पाटील, सुरेश लावंड, सर्जेराव थोरात, उमेश कुलकर्णी, गफ्फार नदाफ, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, सुधीर एकांडे, महादेव सोमदे, अधिकराव निकम, भूषण जगताप, माजी जि. प. सदस्य डॉ. राजकुमार पवार, सविनय कांबळे, रमेश मोहिते, श्रीकांत घोडके, पैलवान आनंदराव मोहिते, विलासराव पवार, कोरेगावचे नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब पाटील, वसंतराव पाटील, गजेंद्र पाटील, ॲड. विजय पाटील, रमेश लवटे, आबा पाटील, मनोज पाटील, अनिल बनसोडे, व्ही. के. मोहिते, रवींद्र जाधव, अमीन शिकलगार, सतीश पाटील, विक्रम मोहिते, राहुल जगताप, दिपक जाधव, उमेश शिंदे, कान्हा लाखे, राजू मुल्ला, अरविंद पाटील, शंकर पाटील, कुबेर माने, मुकुंद चरेगावकर, घन:श्याम पेंढारकर, सुहास जगताप, हणमंतराव जाधव, सुनील कणसे, समाधान चव्हाण, किरण मुळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment