कराडात नव्या वर्षात पाच आरोग्य उपकेंद्रे सूरू होणार;आरोग्य सेवा तातडीने मिळणार...
कराडात नव्या वर्षात पाच आरोग्य उपकेंद्रे सूरू होणार;आरोग्य सेवा तातडीने मिळणार...
कराड दि.25-(प्रतिनिधी) शहरातील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषदेच्या नागरी आरोग्य केंद्रावरील ताण आता कमी होणार आहे. कारण सध्या शहरातील विविध भागात चार प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे शहरातील नागरिकांना आरोग्याची सेवा तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने पंधराव्या वित्त आयोगातून या उपकेंद्रासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
कोरोना काळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या फंडातून आरोग्य सेवेसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध केला होता. या माध्यमातून विविध ठिकाणी त्याचा वापरही करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून कराड शहरात पाच आरोग्य उपकेंद्रांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला. याच निधीतून सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कराड शहरात विविध ठिकाणी या उपकेंद्रासाठी कराड नगरपालिकेच्या माध्यमातून जागा निश्चित करण्यात येऊन या उपकेंद्राच्या कामांना सध्या शहरात प्रारंभ झाला असून नव्या वर्षात ही आरोग्य उपकेंद्रे सूरू करण्यात येणार आहेत.
वाखाण रोडवरील पंपिंग स्टेशन क्र.3 (मुख्याधिकारी निवास्थान) तसेच डूबल गल्लीतील शाळा क्रमांक 11, घनकचरा प्रकल्प मूजावर काॅलनी तसेच छ.संभाजी मार्केट या ठिकाणी ही प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे होणार आहेत. यातील संभाजी मार्केट, डूबल गल्ली, मुख्याधिकारी निवास येथिल उपकेंद्रांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. एका ठिकाणी अजून उपकेंद्रासाठी जागेचा शोध सूरू आहे.
कोरोना सारखी परिस्थिती अथवा अन्य साथीचे रोग उद्भभवल्यास या आरोग्य उपकेंद्राची मोठी मदत मिळणार आहे. शहरात एकट्या नागरी आरोग्य केंद्रावर ताण पडत होता. शिवाय एक लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात तात्काळ आरोग्य सेवेची मोठी अडचण निर्माण होत होती. नागरी आरोग्य केंद्रात केवळ एकाच डॉक्टरवर ताण पडत होता. आता या होणार्या चार आरोग्य उपकेंद्रावर प्रत्येक ठिकाणी एक डॉक्टर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियंता आर डी भालदार, ए आर पवार, मूरलीधर धाईगूडे, मिलिंद शिंदे यांनी उपकेंद्रासाठी शहरातील विविध भागात पाहणी करुन आरोग्य विभागास जागांचे पर्याय दिले होते. त्यानूसार आरोग्य विभागाने चार ठिकाणी जागा निश्चित करुन उपकेंद्राच्या कामांना प्रारंभ केला आहे.
Comments
Post a Comment