Posts

Showing posts from January, 2023

अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी साधला सरस्वतीच्या विद्यार्थ्यांशी संवाद...

Image
  अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी साधला सरस्वतीच्या विद्यार्थ्यांशी संवाद... कराड दि.31-कराडच्या जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयात विद्यार्थांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभावे यासाठी 'सहवास प्रतिभावंतांचा' या कार्यक्रम अंतर्गत पद्मश्री पुरस्कार प्राप्त नाट्य, चित्रपट, मालिका व बालनाट्य चळवळ सुरू ठेवणाऱ्या अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांनी नयना आपटे यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी नाट्य क्षेत्राबाबत विविध विषयांची माहिती सांगितली. कलेचे महत्व सांगताना त्यातून मिळणारा आनंद, नाट्य क्षेत्रातील संधी, नाटक कसे करावे, नाटक करताना कोणत्या क्षमता अंगी असाव्यात, नाट्य क्षेत्रातील संधी, आपण नाटक करू शकतो याबद्द्ल विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. यावेळी छोट्या नाट्यकला ही त्यांनी सादर केल्या. माता अनुसया प्रोडक्शनच्या वतीने शहरात आज नयना आपटे बालनाट्य सादर करणार आहेत. याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. माता अनुसया प्रोडक्शनचे प्रवीणकुमार भारदे या...

कराडात पाणीपट्टी आकारणी विरोधात पाण्यात उतरुन आंदोलन...

Image
  कराडात पाणीपट्टी आकारणी विरोधात पाण्यात उतरुन आंदोलन... कराड दि.31-(प्रतिनिधी) कराड शहरात 24 तास योजना अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपट्टी आकारणी विरोधात विविध संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा व पाणीपट्टीची आकारणी ही पूर्वीच्या वार्षिक आकारणी प्रमाणेच करण्यात यावी या मागणीसाठी आज कराडच्या कृष्णा कोयना नदीपात्रात विविध संघटनांच्यावतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. मानव कल्याणकारी संघटना, भीम आर्मी संघटना व समता सामाजिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की कराड शहरातील वाढीव पाणी बिले संदर्भात कराड शहरातील नागरिकांनी व विविध संघटनेच्या व राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले देऊन आंदोलने केलेली आहेत. आज रोजी सदरची 24 तास पाणी योजना पूर्ण झालेली नाही. असे असताना 24 तास पाणी योजनेच्या दराने बिले दिलेली आहेत. प्रत्यक्षात दोन वेळचे पाणी मिळत असून सध्या केलेली दर आकारणी अन्यायकारक आहे, ती रद्द करुन पूर्वीप्रमाणे वार्षिक बिले देण्यात यावीत व पाणी योजना पूर्ण कराड शहरांमध्ये सुरू झाल्यानंतर बिलांची आका...

कराडच्या हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन...

Image
  कराडच्या हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन... कराड दि.30-अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी येथील हुतात्मा स्मारकास व महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ. बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .  महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक आंदोलनांने गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. अशा या थोर महात्म्याची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने आज येथील हुतात्मा स्तंभास आ.पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी श्रीकांत बाबुराव कोतवाल, बाळकृष्ण कोळेकर, भानुदास पाटील, नाना जानुगडे, संजय भोसले,  हणमंत कराळे व नागरिक उपस्थित होते .

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया विभाग...

Image
  सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया विभाग... कराड ,30 जानेवारी 2023 : सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे आज अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला असून याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण, अमित चव्हाण, व्यवस्थापक डॉ. वेंकटेश मुळे, रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. अभिजित आगाशे व डॉ. शिवकुमार राजमाने उपस्थित होते . याप्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या कार्याचे कौतुक करत नामदार शंभूराज देसाई म्हणाले की, सह्याद्रि हॉस्पिटलने कोरोना काळात केलेेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत आपले कार्य सुरू ठेवले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे . ते पुढे म्हणाले की, रोबोटिक सांधेरोपण तंत्रज्ञान आणि यासारख्या अद्ययावत सुविधा कराडमध्ये उपलब्ध होणे यामुळे शहरातील नागरिकांबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना सुविधा मिळणार आहे . रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ.अभिजित...

कराडच्या पाणीपट्टी आकारणीबाबत तूर्तसा कोणताही निर्णय नाही;मुख्याधिकारी रमाकांत डाके...

Image
  कराडच्या पाणीपट्टी आकारणीबाबत तूर्तसा कोणताही निर्णय नाही;मुख्याधिकारी रमाकांत डाके... कराड दि.30-(प्रतिनिधी) कराड शहरात पाणीपट्टी आकारणीवरून चांगलाच वाद पेटला असून या बाबत विविध पक्षांसह 10 संघटनांनी पाणीपट्टी आकारणी बाबत निवेदन नगरपालिकेकडे दिले आहेत. यावर आज संबंधितांना वेगवेगळ्या वेळा चर्चा करण्यासाठी दिल्या होत्या. मात्र काही चर्चा अपूर्ण असताना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पाणीपट्टी आकारणीत 15 टक्के सवलत देण्याची घोषणा केल्याने नगरपालिकेत गोंधळ उडाला. यावर काँग्रेससह बाळासाहेबांची शिवसेनेने आक्षेप व आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्याधिकारींनी पाणीपट्टी आकारणी बाबत तुर्तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसून 6 फेब्रुवारी रोजी सर्व निवेदन धारकांना एकत्रित बोलावून चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. कराड शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाणीपट्टी मीटर प्रमाणे आकारण्यात येऊ लागली. मात्र त्यानंतर पाणीपट्टीचे आलेल्या बिलावरून शहरातील नागरिकांनी या पाणीपट्टी विरोधात आक्रमक भूमिका घेत सदरची पाणीपट्टी ही अवास्तव अवाजावी व अधि...

कराडात मनसेच्या कार्यक्रमाचा जल्लोष; विश्रामगृहात खळ्ळ-खट्याक....?

Image
  कराडच्या विश्रामगृहातील काचेचा दरवाजा फूटला;काचा हावेत उडाल्या... कराड दि.30 (प्रतिनिधी) दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या येथील नवीन शासकीय विश्रामगृहातील प्रवेशद्वाराचा एक मोठा काचेचा दरवाजा अचानक फुटल्याने विश्रामगृहात एकच गोंधळ उडाला. मात्र हा काचेचा दरवाजा कशामुळे फुटली हे मात्र संबंधित विश्रामगृह देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कळले नाही. मात्र काच अचानक फुटल्यानंतर जमिनीवर पडलेले काचेचे तुकडे हवेत उडताना साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी पाहिल्याने त्याही आश्चर्यचकित झाल्या होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पूर्वीच्या विश्रामगृह शेजारी भव्य नवीन विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. सदरचे विश्रामगृह हे प्रशासनाच्या वतीने चालविण्यास देण्यात आले आहे. काल सायंकाळी जुन्या विश्रामगृहात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आगमन झाले.  आज सकाळी विश्रामगृह परिसरात मोठी गर्दी होती. मात्र नवीन विश्रामगृहाकडे कोणीही फिरकले नव्हते. या ठिकाणी महिला कर्मचा...

कराडात अमित ठाकरे यांचे उत्साहात स्वागत;उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन...

Image
  कराडात मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अ मित ठाकरे यांचे उत्साहात स्वागत;उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन... कराड दि.29 (प्रतिनिधी) मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍याची सातार्‍यातून सूरूवात झाल्यानंतर सायंकाळी ठाकरे यांचे कराडच्या विश्रामगृहात आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष महेश जगताप, दादा सिंगण, सागर बर्गे, विनायक भोसले तसेच नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे ठाकरे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. उद्या कराड येथे अमित ठाकरे हे विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता कराड शासकीय विश्रामगृह येथून दूचाकी रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये अमित ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ही रॅली कृष्णा घाटावर गेल्यानंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अमित ठाकरे अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज येथे विद्यार्थी सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. दुपारी त...

कराडात त्रिनय स्पोर्टस्‌ प्रिमियर क्रिकेट लीगचे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन...

Image
  छत्रपती शिवाजी महाराज चषक त्रिनय स्पोर्टस्‌ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी फलंदाजी करताना डॉ. अतुल भोसले.... कराडात त्रिनय स्पोर्टस्‌ प्रिमियर क्रिकेट लीगचे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन... कराड दि.28-येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज चषक त्रिनय स्पोर्टस्‌ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. भोसले यांनी फलंदाजी करत, क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. कार्वे येथील त्रिनय – सुमित मित्र परिवार, आव्हान गणेश नवरात्र उत्सव मंडळ, कै. नितीन गवळी मित्र परिवार आणि एस.एम.एच. कराड यांच्यावतीने शिवाजी स्टेडियमवर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मैदानावर फलंदाजी करत, क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, कार्वे गावचे सरपंच संदीप भांबुरे, उपसरपंच रोहित जाधव, माजी उपसरपंच वैभव थोरात, अधिकराव गुजले...

साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी-केद्रीय मंत्री नितीन गडकरी....

Image
  साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती करावी-केद्रीय मंत्री नितीन गडकरी.... सातारा दि. 27 : महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे.  तरी साखर कारखानदारांनी  इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. फलटण येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण रस्ता चौपदरीकरण व कॉक्रिटीकरण,  शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट  रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचे  भूमिपूजन व कोनशिला अनावरण आणि लोणंद-सातारा रस्ता मजबुतीकरणाचे लोकार्पण डिजिटल पध्दतीने  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, शहाजी ...

कराड येथे 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...

Image
  कराड येथे 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद... कराड दि.27- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने थेट प्रक्षेपण कराड येथील शिक्षण मंडळ संचलित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आगामी शालेय व महाविद्यालयीन परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड येथील शिक्षण मंडळ संचलित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत, परीक्षेबाबत मूलभूत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.  दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने कराड येथील प्रीतिसंगम उद्यानात नुकत्याच शालेय विद्...

पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम पूर्ण करण्याची खा.श्रीनिवास पाटील यांची ना.नितिन गडकरी यांच्याकडे मागणी....

Image
कराड-चिपळूण मार्गावरील पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम पूर्ण करावे;खा.श्रीनिवास पाटील यांची ना.नितिन गडकरी यांच्याकडे मागणी....  कराड दि.27- ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पोलादपूर - महाबळेश्वर - पाचगणी - वाई सुरुर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा. तसेच कोकणला जोडणारा कराड-चिपळूण राष्ट्रीय मार्ग क्र.166 ई वरील पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम नव्याने पूर्ण करावे अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केली. ना.नितीन गडकरी हे शुक्रवारी नियोजित दौ-यानिनित्त सातारा जिल्ह्यात आले होते. यावेळी खा.श्रीनिवास पाटील यांनी त्यांची भेट घेऊन ह्या मागण्या केल्या आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी ना.गडकरी यांच्याकडे दिले आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे, राज्य महामार्ग एस.एच.139 मुंबई पुणे बंगलोर ए.एच.47 ला सुरुर (जि.सातारा) ते मुंबई-गोवा एन.एच.-66 पोलादपूर (जि.रायगड) येथे वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर मार्गे जोडतो. हा रस्ता माझ्या लोकसभा मतदारसंघातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा ...

कराडात प्रजासत्ताक दिनानिमित्त इदगाह मैदानात वृक्षारोपन.....

Image
  प्रजासत्ताक दिनी इदगाह मैदानात वृक्षारोपन..... कराड दि.26 (प्रतिनिधी) वृक्षारोपन काळाची गरज असून शासन स्तरावर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वत्र वृक्षारोपन केले जात आहे.याच अनूशंघाने आज प्रजासत्ताक दिनाचे औचत्य साधून शाही इदगाह मैदान ट्रस्टच्यावतीने शाहीन हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थित इदगाह मैदानावर वृक्षारोपन करण्यात आले. माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरात कराड नगरपरिषद, सामाजिक संस्थानी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केले आहे. इदगाह मैदानावर गेल्या काही वर्षात इदगाह ट्रस्ट व नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची हजारो झाडे लावून त्याचे संगोपन केल्याने मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडी व हिरवळ तयार झाली आहे. आज प्रजासत्ताक दिनी इदगाह मैदान ट्रस्टी व सामाजिक कार्यकर्ते साबिरमियाॅं मुल्ला व शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक अल्नासिर मोमीन, शिक्षक लतिफ शेख, तय्यब मुल्ला, झुल्फिकार मुल्ला, सलमान शेख, रमजान मुल्ला, असदखान मुजावर, जहाॅंगीर शेख व विद्यार्थी यांच्या उपस्थित वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.

यशस्वी होण्यासाठी युवकांनी वैचारीक क्षमता वाढवावी - डॉ. राधाकृष्णन पिल्लई...

Image
 यशस्वी होण्यासाठी युवकांनी वैचारीक क्षमता वाढवावी - डॉ. राधाकृष्णन पिल्लई... कराड, दि. 25- युवकांना व्यवसायात सुरू करायचे असतील; तर त्यासाठी स्वत: पात्र व्हावे. त्यासाठी युवकांनी वैचारीक क्षमता वाढवणे आवश्यक असून त्यांनी चाणक्य नीतीचे अवलोकन करणे ही सध्याच्या युगाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, प्रशिक्षक व वैयक्तिक मार्गदर्शक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी व्यक्त केले. येथील दि कराड अर्बन बँकेच्या 106 व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेच्या शताब्दी सभागृहात कै. वा. ग. तथा आण्णासाहेब चिरमुले ट्रस्ट सातारा व दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास शिबिरात कॉलेज युवक-युवतींना मार्गदर्शन करताना डॉ. पिल्लई बोलत होते.यावेळी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्याधिकारी सीए. दिलीप गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पिल्लई म्हणाले, कराड अर्बन बँक दूरदृष्टी ठेवून आधीच पुढील एका वर्षाचे नेटके नियोजन करणारी बँक असल्याने ही बँक सहकारी वित्तीय क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून स्थिरावलेली आहे. उपस्थ...

उंडाळे विभागातील जलसमृद्धीसाठी पृथ्वीराजबाबा कटिबध्द : इंद्रजित चव्हाण....

Image
  उंडाळे : येथे दक्षिण मांड नदीवरील केटी वेअर बंधारे उभारणीचे भूमिपूजन करताना इंद्रजित चव्हाण, समवेत उदयसिंह पाटील, संगीता माळी, उदय पाटील व इतर उंडाळे विभागातील जलसमृद्धीसाठी पृथ्वीराजबाबा कटिबध्द : इंद्रजित चव्हाण.... कराड दि.25 : माजी मंत्री विलासराव पाटील - उंडाळकर यांनी कराड दक्षिणमध्ये डोंगरी विभागाचा कायापालट केला. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वर्गीय विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या पश्चात उंडाळे विभागातील विकासाच्या कामांना खंड पडू दिला नाही. काले, उंडाळे, मनव व टाळगाव येथे दक्षिण मांड नदीवर केटी वेअर बंधारे उभारणीसाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी देत या विभागातील विकासाचे नाते अधिक घट्ट ठेवले आहे. यातून उंडाळे विभागात जलसमृध्दीसाठी पृथ्वीराज बाबा कटिबध्द आहेत. असे मत युवा नेते इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले. उंडाळे (ता. कराड) येथे दक्षिण मांड नदीवर महादेव मंदिराजवळ जलसंधारण विभागाच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन सहकारी रयत साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील व युवा नेते इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी श्...

कराडच्या पांडुरंग करपे यांना यंदाचा कराड गाैरव पुरस्कार जाहीर...

Image
  कराडच्या पांडुरंग करपे यांना यंदाचा ' कराड गाैरव पुरस्कार'  जाहीर... कराड दि.25-येथील आदरणीय पी.डी.पाटील गाैरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कराड गाैरव पुरस्कार येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिध्द मंडप व्यावसायिक पांडुरंग जयसिंग करपे यांना त्यांच्या उल्लेखनिय समाजकार्या बद्दल जाहीर झाला आहे.  प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आ. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पांडुरंग करपे यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डाॅ. अशाेकराव गुजर, विश्वस्त ऍड.मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, साै रेश्मा काेरे, साै शाेभा पाटील व अबुबकर सुतार यांची उपस्थिती हाेती. पांडुरंग करपे हे सातारा जिल्हा बुरुड समाजाचे उपाध्यक्ष असून अनेक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक शिक्षण संस्थांना आर्थिक सहकार्य केले आहे. त्यामध्ये जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल शिरढाेण जि.सांगली व वर्ये जि.सातारा, शिक्षण मंडळ कराड तसेच, शालेय विद्यार्थ्यांना शालेय व गणवेश वाटप, मूक बधीर विद्यालय यांना आर्थिक मदत व खाऊ वाट...

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत कराडच्या सरस्वती शैक्षणिक संकुलातील पाच शिक्षिका ठरल्या विजेत्या...

Image
  जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत  कराडच्या सरस्वती शैक्षणिक संकुलातील पाच शिक्षिका  ठरल्या विजेत्या...  कराड दि.25 (प्रतिनिधी) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे (SCRT) आयोजित राजस्तरिय नवोपक्रम स्पर्धा 2022-23 अंतर्गत सातारा जिल्ह्यात नवोपक्रम स्पर्धा झाली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती शैक्षणिक संकुलातील 5 शिक्षिकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शिक्षकांकडून राबवण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती इतर शिक्षकांनाही मिळावी, या उद्देशाने नवोपक्रम स्पर्धा घेण्यात येते. सातारा जिल्हास्तरीय स्पर्धा महात्मा फूले आध्यापक विद्यालय सातारा येथे झाल्या. यामध्ये सरस्वती शैक्षणिक संकुलातील 5 शिक्षिका विजेत्या ठरल्या आहेत. या स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक गटात सौ.तृप्ती उमेश गोखले (प्रथम क्रमांक), सौ.भाग्यश्री महेश कोळेकर (द्वितीय क्रमांक) तर प्राथमिक गटात झालेल्या स्पर्धेत सौ.वर्षी देवभूषण आफळे (तृतीय क्रमांक), सौ.शूभांगी वैभवकूमार घाटे (उत्तेजनार्थ), माध्यमिक गटात सौ.गौरी मधूकर जाधव  (तृ...

कराड शहरातील प्रभात टाॅकीजमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात.......

Image
कराडात पठाण चित्रपटाला गर्दी;प्रभात मध्ये पोलिस बंदोबस्त तैनात... कराड दि.25 (प्रतिनिधी) यशराज फिल्म प्रस्तूत शाहरुख खान व दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण चित्रपटाला विरोध होत असतानाच आज महाराष्ट्रात हिंदूत्वादी संघटना तसेच बजरंग दलाने चित्रपट प्रदर्शित करू नये केल्यास आंदोलन करु असा इशारा दिल्याने चित्रपट गृहाला पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.कराडला हा चित्रपट प्रभात टाॅकीजमध्ये आज रिलिज होत असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पो.निरिक्षक बी आर पाटील स्वता कर्मचार्‍यांसह बंबोबस्तावर आहेत.पठाण पाहण्यासाठी प्रभात मध्ये प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे. गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा पठाण चित्रपट आज देशभरात प्रदर्शित होत आहे. परंतु बेशरम रंग गाण्यातील दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरुन सुरु झालेला वाद व चित्रपटाला विरोध अद्यापही कायम आहे. हिंदूत्वादी संघटना तसेच बजरंग दलाने हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी भूमिका घेतली आहे. पठाण चित्रपटाचे भारता व्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशां...

कराडात देशभक्तिपर समूह गीत-गायन स्पर्धांना प्रारंभ...

Image
कराडात देशभक्तिपर समूह गीत-गायन स्पर्धांना प्रारंभ... कराड दि 24- प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील आदरणीय पी.डी.पाटील गाैरव प्रतिष्ठानच्यावतीने घेतल्या जाणार्‍या ' देशभक्तिपर समूह गीत- गायन स्पर्धांना आज प्रीतीसंगम बागेत प्रारंभ झाला. दाेन दिवस हाेणार्‍या या स्पर्धांमध्ये आज कराड नगर परिषद व संस्थांच्या प्राथमिक शाळांच्या स्पर्धा आनंदी वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. अशाेकराव गुजर यांचे हस्ते झाले.यावेळी विश्वस्त ऍड. मानसिंगराव पाटील, साै रेश्मा काेरे, संयाेजन समिती सदस्य प्रा. एस्. ए. डांगे, प्रा.रामभाऊ कणसे, संभाजीराव पाटील, नरेंद्र तथा प्रकाश पवार, अबुबकर सुतार उपस्थिती हाेते. आजच्या स्पर्धेमध्ये १० शाळांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये कराड नगरपरिषद शाळा क्र. ३,७,९ व १२ तसेच आदर्श प्राथमिक शाळा, प्रॅक्टिंसींग स्कूल, कै.का.ना.पालकर आदर्श प्राथमिक शाळा, ऍकडमी हाईटस् स्कूल, वेणूताई इंग्लिश मिडीयम स्कूल व संजीवनी इन्स्टिट्युटची मतिमंद मुलांची शाळा आदि शाळांचा सहभाग हाेता. परिक्षक म्हणून अशाेकराव कुलकर्णी (कडेगांव), प्रकाशराव बापट व साै गिता दातार (स...

खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण, जावळी तालुक्यात मोबाईल टाॅवरला मान्यता....

Image
 खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण, जावळी तालुक्यात मोबाईल टाॅवरला मान्यता.... कराड दि.24-सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण व जावळी तालुक्यातील आणखी सहा गावात मोबाईल टॉवरला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेली बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी लोकसभेत आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नातून या अगोदरच जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील 166 गावात टॉवर मंजूर झाले आहेत. आता आणखी पाटण, जावली व सातारा तालुक्यातील 7 टॉवरला मंजूरी मिळाली आहे. पाटण व जावली व सातारा तालुक्यातील दुर्गम भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी पाटण तालुक्यातील कारळे, गलमेवाडी, सळवे, ऊरुल  आणि जावली तालुक्यातील फाळणी, वाघदरे व सातारा तालुक्यातील पारंबे गावांसाठी बीएसएनएलचे मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. अशी मीहिती खा.श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.  सातारा जिल्हा हा डोंगररांगामध्ये विखुरला गे...

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कु. प्राची देवकरला डॉ. अतुल भोसलेंचे पाठबळ...

Image
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कु. प्राची देवकरला डॉ. अतुल भोसलेंचे पाठबळ... किरपे येथे विशेष नागरी सत्कार; भविष्यातील वाटचालीसाठी आर्थिक सहकार्य... कराड, दि.24- नॅशनल क्रॉस कंट्रीमध्ये सुवर्णपदक पटकावित, खेलो इंडिया स्पर्धेत निवड होण्याची कामगिरी किरपे (ता. कराड) येथील कु. प्राची अंकुश देवकर हिने करून दाखविली आहे. किरपेसारख्या छोट्याशा गावातून पुढे येत राष्ट्रीय पातळीवर यश पटकविणाऱ्या कु. प्राचीचा विशेष नागरी सत्कार करत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी तिला भविष्यातील वाटचालीसाठी आर्थिक मदत करत पाठबळ दिले आहे.  आसाम येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल क्रॉस कंट्रीमध्ये कु. प्राची अंकुश देवकर हिने सुवर्णपदक पटकाविले असून, तिची खेलो इंडिया स्पर्धेत निवड झाली आहे. तिच्या या सुवर्णकामगिरीबद्दल किरपे ग्रामस्थांच्यावतीने विशेष नागरी सत्कार करण्यात आला. डॉ. भोसले यांच्या हस्ते कु. प्राची हिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  तसेच किरपे गावचेच सुपुत्र मंगेश कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री. कांबळे यांच्यावतीने त्य...

कराड दक्षिणमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. अतुल भोसले...

Image
  कराड दक्षिणमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. अतुल भोसले... कराड, दि.23- पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांच्या शालेय परीक्षेपूर्वी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमांतर्गत कराड दक्षिणमधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजता विविध केंद्रांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. तसेच २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.  रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालय, छत्रपती संभाजी विद्यालय, सौ. ताराबाई मोहिते विद्यालय, तसेच कोयना वसाहत येथील के.सी.टी. कृष्णा स्कूल या केंद्रांवर मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजता चित्रकला स्पर्धा होणार असून, यामध्ये सुमारे १२०० विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमात ...

शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने देशाच्या जडणघडणीत दिग्गज विद्यार्थी दिले;ना.दीपक केसरकर...

Image
  शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने देशाच्या जडणघडणीत दिग्गज विद्यार्थी दिले;ना.दीपक केसरकर... कराड दि.23-विद्यार्थ्यांच्या हृदय व मेंदूपर्यंत पोहोचणारी मातृभाषाच असते. यासाठी विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगावा. पुढील दहा वर्षात भारत जगातला सर्वात तरुण देश असेल. त्यावेळी भारत जगाचे नेतृत्व करायला सज्ज असेल. शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल ही कराडची वैभव स्थाने आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षण मंडळाने व टिळक हायस्कूलने देशाच्या जडणघडणीत अनेक दिग्गज विद्यार्थी दिले आहेत. यशवंतराव चव्हाण व पै. खाशाबा जाधव या कराडच्या सुपुत्रांनी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाची मान उंचावली असल्याचे गौरोद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले. येथील शिक्षण मंडळ कराड या संस्थेच्या व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल हुद्देदार, व्हाइस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, मुख्याध्यापक गोकुळ अहिरे यांची प्रमुख उपस्थि...

कराडात आईच्या निधनानंतर तेरावा झाला अन पिग्मी एजंट मूलाने आत्महत्या केली..

Image
  कराडात आईच्या निधनांनतर तेरावा झाला अन पिग्मी एजंट मूलाने आत्महत्या केली... कराड दि.22 (प्रतिनिधी) दीर्घ आजाराने व वयोमानामुळे आईचे निधन झाले. आईच्या निधना नंतर तेराव्याचा विधी पार पडला.अन दूसर्‍या दिवशीच मूलांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कराडात घडली आहे. पिग्मी एजंट म्हणून काम करणार्‍या या अविवाहित मूलांने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत कराड शहर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. त्याबाबत मिळालेल्या माहितीनूसार सोमवार पेठेत 2000 प्लाझा येथे अजित प्रभाकर करंदीकर (वय-34) हा आपला मोठा भाऊ व आई समवेत राहत होता. वयोमानामुळे आईचं निधन झालं. आईच्या निधनामुळे अजित व त्याचा भावाने सर्व विधी सोपस्कर पार करीत तेरावा ही घातला. त्यानंतर दूसर्‍या दिवशी (काल शनिवार दि.21 जानेवारी) दूपार नंतर अजितने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला या प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्याने याबाबत पोलिसात कळवले. अजित हा शहरातील नामवंत बॅंकेचा पिग्मी एजंट म्हणून काम करीत होता. वडीलांचे निधन झ...

कराड नगरपरिषदेंकडून मकर संक्राती निमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन...

Image
  कराड नगरपरिषदेंकडून मकर संक्राती निमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन... कराड दि.22-कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने खास कराड शहरातील महिलांसाठी मकर संक्राती निमित्त स्नेह मेळावा व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती या विभागाच्या व्यवस्थापक दिपाली दिवटे यांनी दिली. मंगळवार दि. २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता कराड नगरपरिषदेच्या प्रंगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जास्तीत जास्त महिलांनी स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.

शिक्षण मंडळाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांच्या अफलातून कलाकृतीस उत्सफूर्त प्रतिसाद....

Image
शिक्षण मंडळाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांच्या अफलातून कलाकृतीस उत्सफूर्त प्रतिसाद.... कराड दि.22-माणूस आणि निसर्ग यांचे असणारे अद्वितीय नाते, बोबडे बोल, प्रभावी शब्दफेक व लटपटणा-या पावलांनी नूतन मराठी शाळेच्या बालचमुंनी आपल्या नृत्यातून दाखवून दिले.  येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभात नूतन मराठी शाळेच्या वतीने आयोजित निसर्ग माझा प्राण या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात बहारदार सादरीकरण केले . यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र  लाटकर, तसेच माजी मुख्याध्यापिका श्रीमती इंदु जोशी, प्रभा जोशी, मीरा जोशी, माजी लिपिक सौ. चौकर बाई मुख्याध्यापिका उर्मिला कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.  या सांस्कृतिक कार्यक्रमात निसर्ग माझा प्राण या संकल्पनेवर आधारित विविध गीते, नृत्ये, नाटयछटा सादर करण्यात आल्या. यामध्ये फुलपाखरु छान किती दिसते, हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया, झुंजू मुंजू पहाट झाली, वाऱ्यावरती गंध पसरला, चिउताई चिउता...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. शरद पवार यांच्या हस्ते जयवंत शुगर्सला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार प्रदान...

Image
  जयवंत शुगर्सला ‘व्ही.एस.आय.’कडून सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार प्रदान... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार शरद पवार व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती... कराड दि.21: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय) च्या प्रांगणात उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी सन २०२१-२२ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला प्रदान करण्यात करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले व श्री. विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी जलसंपदामंत्री आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘व्ही.एस.आय.’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील आदीं...

कराडात चिंगळे बंधू मिरची मसाला ट्रेडर्सच्या हळदीकुंकू समारंभास महिलांचा मोठा प्रतिसाद...

Image
  कराडात चिंगळे बंधू मिरची मसाला ट्रेडर्सच्या हळदी कुंकू समारंभास महिलांचा मोठा प्रतिसाद... कराड दि.21 (प्रतिनिधी) मकर संक्रांती निमित्ताने येथील प्रतिथयश चिंगळे बंधू मिरची मसाला ट्रेडर्सचे मालक सोमनाथ चिंगळे (काका) यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभास शहर व परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील मार्केट यार्ड (गेट नं.2) येथे असणारे चिंगळे बंधू यांचे मिरची मसाला ट्रेडर्स मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या हळदी कुंकू समारंभात सहभागी झालेल्या महिलांना सोमनाथ चिंगळे परिवाराकडून भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने दूकानांत महिलांना सहज व अचूक निवडक मसाले व अन्य आॅग्रॅनिक पध्दतीचे पदार्थ, मसाल्यात वापरण्यात येणारी विविध पदार्थ, लोंचे, मसाला पॅकेट याची माहिती व्हावी या उद्देशाने मांडण्यात आली होती. याची माहिती अभिषेक चिंगळे यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिली. या हळदीकुंकू समारंभाचा प्रारंभ पार्वती चिंगळे, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, सौ. रोहिणी शिंदे डॉ. तेजस्विनी पाटील, सौ. रश्मी एरम, माज...

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार...

Image
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार... सातारा दि. 20: जिल्ह्यात हमीदा एज्युकेशन सोसायटीज डॉन ॲकॅडमी (सिडनी पॉईंटरोड) पाचगणी ता.महाबळेश्वर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 500 आपदा मित्र स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 5 आपदा मित्र स्वयंसेवकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातनिधीक स्वरुपात मोफत आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आले. शासनामार्फत या आपदा मित्रांचा सुरक्षा विमा उतरविला जाणार आहे. हे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील दुर्घटना, संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांचे देखरेखीखाली सातारा जिल्हयातील एकूण 500 स्वयंस...

टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला;आ. पृथ्वीराज चव्हाण...

Image
  टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला;आ. पृथ्वीराज चव्हाण... कराड दि.20-शंभर वर्षे एखादी शिक्षण संस्था कार्यरत राहणे सोपी गोष्ट नाही. शिक्षण मंडळाची व टिळक हायस्कूलची केवळ वाटचाल सुरु नसून भरभराट सुरु असल्याचा सार्थ अभिमान आहे. मी देशात कुठेही शिकलो तरी मी ज्या टिळक हायस्कूलमध्ये शिकलो ती राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या कायम स्मरणात आहे. शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलने महाराष्ट्रात दोन मुख्यमंत्री देण्याचा इतिहास घडविला आहे. ही महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ व पहिलीच घटना असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभास सदिच्छा भेटीप्रसंगी आ.चव्हाण बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजंेद्र लाटकर, अध्यक्ष डाॅ. अनिल हुद्देदार, सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, संचालक उदय थोरात, कौन्सिल सदस्य, अॅड. विक्रम कुलकर्णी, अॅड. सदानंद चिंगळे, सुधीर घाटे, डाॅ. मीन...