कराड येथे 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...

 


कराड येथे 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...

कराड दि.27- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने थेट प्रक्षेपण कराड येथील शिक्षण मंडळ संचलित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आगामी शालेय व महाविद्यालयीन परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड येथील शिक्षण मंडळ संचलित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधत, परीक्षेबाबत मूलभूत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

दरम्यान, ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने कराड येथील प्रीतिसंगम उद्यानात नुकत्याच शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, नगरसेवक सुहास जगताप, मुख्याध्यापक संतोषकुमार गिरी, रमेश मोहिते, उमेश शिंदे, तानाजी देशमुख यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक