कराडात मनसेच्या कार्यक्रमाचा जल्लोष; विश्रामगृहात खळ्ळ-खट्याक....?
कराडच्या विश्रामगृहातील काचेचा दरवाजा फूटला;काचा हावेत उडाल्या...
कराड दि.30 (प्रतिनिधी) दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या येथील नवीन शासकीय विश्रामगृहातील प्रवेशद्वाराचा एक मोठा काचेचा दरवाजा अचानक फुटल्याने विश्रामगृहात एकच गोंधळ उडाला. मात्र हा काचेचा दरवाजा कशामुळे फुटली हे मात्र संबंधित विश्रामगृह देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कळले नाही. मात्र काच अचानक फुटल्यानंतर जमिनीवर पडलेले काचेचे तुकडे हवेत उडताना साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी पाहिल्याने त्याही आश्चर्यचकित झाल्या होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पूर्वीच्या विश्रामगृह शेजारी भव्य नवीन विश्रामगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. सदरचे विश्रामगृह हे प्रशासनाच्या वतीने चालविण्यास देण्यात आले आहे. काल सायंकाळी जुन्या विश्रामगृहात मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आगमन झाले.
आज सकाळी विश्रामगृह परिसरात मोठी गर्दी होती. मात्र नवीन विश्रामगृहाकडे कोणीही फिरकले नव्हते. या ठिकाणी महिला कर्मचारी प्रवेशद्वाराच्या समोरील परिसर व पायऱ्यांची साफसफाई, झाडलोट करण्याच्या कामात गुंतल्या होत्या. त्याच वेळी अचानक मोठा आवाज झाला व विश्रामगृहाच्या या प्रवेशद्वारावरच बाहेरील बाजूस काचांचा खर्च पडल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी पाहिले. तसेच याठिकाणी काचेचे तुकडे बराच वेळ हवेत उडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते पाहून आश्चर्यचिकित झालेल्या महिला तेथून निघून गेल्या.
दरम्यान याबाबत नवीन विश्रामगृहाच्या संबंधित देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्याशी याबाबत विचारणा केली असता काच फुटली त्यावेळी या ठिकाणी कोणीही नसल्याचे व ती अचानक फुटल्याचे संबंधिताने सांगितले. या प्रवेशद्वारावर दोन भव्य काचा उघडझाप स्वरूपात बसवले असून अन्य पाच काचा इतर बाजूस बसवण्यात आल्या आहेत यातील उघडझाप करणाऱ्या दोन काचा पैकी एकच म्हणजेच एक दरवाजा हा फुटला आहे.
Comments
Post a Comment