अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी साधला सरस्वतीच्या विद्यार्थ्यांशी संवाद...
अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी साधला सरस्वतीच्या विद्यार्थ्यांशी संवाद...
कराड दि.31-कराडच्या जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयात विद्यार्थांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभावे यासाठी 'सहवास प्रतिभावंतांचा' या कार्यक्रम अंतर्गत पद्मश्री पुरस्कार प्राप्त नाट्य, चित्रपट, मालिका व बालनाट्य चळवळ सुरू ठेवणाऱ्या अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मुख्याध्यापक विजय कुलकर्णी यांनी नयना आपटे यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी नाट्य क्षेत्राबाबत विविध विषयांची माहिती सांगितली. कलेचे महत्व सांगताना त्यातून मिळणारा आनंद, नाट्य क्षेत्रातील संधी, नाटक कसे करावे, नाटक करताना कोणत्या क्षमता अंगी असाव्यात, नाट्य क्षेत्रातील संधी, आपण नाटक करू शकतो याबद्द्ल विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. यावेळी छोट्या नाट्यकला ही त्यांनी सादर केल्या.
माता अनुसया प्रोडक्शनच्या वतीने शहरात आज नयना आपटे बालनाट्य सादर करणार आहेत. याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. माता अनुसया प्रोडक्शनचे प्रवीणकुमार भारदे यांनी बालनाट्य चळवळ व यासाठी माता अनुसया प्रोडक्शन करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांकडून कराडात होणाऱ्या बाल नाटकासाठी छोट्या छोट्या नाट्यकला सादर करून घेत नाटकासाठी प्रोत्साहन दिले.
यावेळी नयना आपटे यांचा सत्कार मुख्याध्यापक विजय कुलकर्णी व मुख्याध्यापिका सौ.रुपाली तोडकर यांनी तर शाळेतील नाट्य विभागात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवीणकुमार भारदे यांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ.सोनाली जोशी, शाळेचे हितचिंतक श्री. व सौ.वेदपाठक, डॉ.जोशी, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment