सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया विभाग...

 

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया विभाग...

कराड ,30 जानेवारी 2023 : सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे आज अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला असून याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे संचालक दिलीपभाऊ चव्हाण, अमित चव्हाण, व्यवस्थापक डॉ. वेंकटेश मुळे, रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. अभिजित आगाशे व डॉ. शिवकुमार राजमाने उपस्थित होते .

याप्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या कार्याचे कौतुक करत नामदार शंभूराज देसाई म्हणाले की, सह्याद्रि हॉस्पिटलने कोरोना काळात केलेेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जपत आपले कार्य सुरू ठेवले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे .

ते पुढे म्हणाले की, रोबोटिक सांधेरोपण तंत्रज्ञान आणि यासारख्या अद्ययावत सुविधा कराडमध्ये उपलब्ध होणे यामुळे शहरातील नागरिकांबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना सुविधा मिळणार आहे .

रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ.अभिजित आगाशे म्हणाले की, वयोमानाप्रमाणे सांध्यांमध्ये झीज होणे ही सामान्य समस्या आहे. जसजशी झीज वाढत जाते तशी व्याधी आणि दुखणे वाढू लागते. कालांतराने शस्त्रक्रिया हाच एक उपाय असतो. रोबोटिक प्रणालीने मानवी हस्तक्षेप हा कमी केला असून त्या प्रक्रियेतील अचूकता वाढवली आहे. याचे चांगले परिणाम दिसून येतात आणि रूग्णांच्या जीवनमानामध्ये लक्षणीय सुधारणा होते व या तंत्रज्ञानाची अचूकता ही अनेक गोष्टींनी साध्य होते. या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेली कृत्रिम बुध्दिमत्ता, ऑटोमेशन, त्यामुळे कमी झालेला मानवी हस्तक्षेप, शस्त्रक्रियेआधी त्रिमिती प्रतिमेमुळे एकंदर स्थितीचा अचूक वेध, शस्त्रक्रियेच्या दृष्टीने करावी लागणारी तयारी आणि वास्तविक शस्त्रक्रियेची प्रक्रिया यामुळे अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकते .

या सर्व गोष्टींमुळे कमीत कमी रक्तस्त्राव, रूग्णालयात कमी कालावधीसाठी वास्तव्य आणि लवकरात लवकर बरे होणे साध्य होऊ शकते

डॉ. आगाशे पुढे म्हणाले की, ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया आता कराड मध्ये अतिशय किफायतशीर दरात म्हणजेच 3.15 लाख रुपयांत दोन्ही गुडघ्याच्या ऑपरेशन व इंपोर्टेड सांध्यासहित उपलब्ध करून देण्यात आहे

सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचे व्यवस्थापक डॉ. वेंकटेश मुळे म्हणाले की, अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया विभाग हा फक्त सह्याद्रि हॉस्पिटलसाठी नव्हे तर कराड, सातारा आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे .

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक