कराड शहरातील प्रभात टाॅकीजमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात.......
कराडात पठाण चित्रपटाला गर्दी;प्रभात मध्ये पोलिस बंदोबस्त तैनात...
कराड दि.25 (प्रतिनिधी) यशराज फिल्म प्रस्तूत शाहरुख खान व दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण चित्रपटाला विरोध होत असतानाच आज महाराष्ट्रात हिंदूत्वादी संघटना तसेच बजरंग दलाने चित्रपट प्रदर्शित करू नये केल्यास आंदोलन करु असा इशारा दिल्याने चित्रपट गृहाला पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.कराडला हा चित्रपट प्रभात टाॅकीजमध्ये आज रिलिज होत असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पो.निरिक्षक बी आर पाटील स्वता कर्मचार्यांसह बंबोबस्तावर आहेत.पठाण पाहण्यासाठी प्रभात मध्ये प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली आहे.
गेली अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा पठाण चित्रपट आज देशभरात प्रदर्शित होत आहे. परंतु बेशरम रंग गाण्यातील दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरुन सुरु झालेला वाद व चित्रपटाला विरोध अद्यापही कायम आहे. हिंदूत्वादी संघटना तसेच बजरंग दलाने हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी भूमिका घेतली आहे.
पठाण चित्रपटाचे भारता व्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होत आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Comments
Post a Comment