कराडच्या हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन...
कराडच्या हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन...
कराड दि.30-अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी येथील हुतात्मा स्मारकास व महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ. बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक आंदोलनांने गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. अशा या थोर महात्म्याची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने आज येथील हुतात्मा स्तंभास आ.पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी श्रीकांत बाबुराव कोतवाल, बाळकृष्ण कोळेकर, भानुदास पाटील, नाना जानुगडे, संजय भोसले, हणमंत कराळे व नागरिक उपस्थित होते .
Comments
Post a Comment