कराडात प्रजासत्ताक दिनानिमित्त इदगाह मैदानात वृक्षारोपन.....
प्रजासत्ताक दिनी इदगाह मैदानात वृक्षारोपन.....
कराड दि.26 (प्रतिनिधी) वृक्षारोपन काळाची गरज असून शासन स्तरावर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वत्र वृक्षारोपन केले जात आहे.याच अनूशंघाने आज प्रजासत्ताक दिनाचे औचत्य साधून शाही इदगाह मैदान ट्रस्टच्यावतीने शाहीन हायस्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थित इदगाह मैदानावर वृक्षारोपन करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरात कराड नगरपरिषद, सामाजिक संस्थानी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केले आहे. इदगाह मैदानावर गेल्या काही वर्षात इदगाह ट्रस्ट व नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची हजारो झाडे लावून त्याचे संगोपन केल्याने मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडी व हिरवळ तयार झाली आहे.
आज प्रजासत्ताक दिनी इदगाह मैदान ट्रस्टी व सामाजिक कार्यकर्ते साबिरमियाॅं मुल्ला व शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक अल्नासिर मोमीन, शिक्षक लतिफ शेख, तय्यब मुल्ला, झुल्फिकार मुल्ला, सलमान शेख, रमजान मुल्ला, असदखान मुजावर, जहाॅंगीर शेख व विद्यार्थी यांच्या उपस्थित वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.



Comments
Post a Comment