कराडात त्रिनय स्पोर्टस् प्रिमियर क्रिकेट लीगचे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते उद्घाटन...
छत्रपती शिवाजी महाराज चषक त्रिनय स्पोर्टस् प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी फलंदाजी करताना डॉ. अतुल भोसले....
कराडात त्रिनय स्पोर्टस् प्रिमियर क्रिकेट लीगचे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते उद्घाटन...
कराड दि.28-येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज चषक त्रिनय स्पोर्टस् प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. भोसले यांनी फलंदाजी करत, क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.
कार्वे येथील त्रिनय – सुमित मित्र परिवार, आव्हान गणेश नवरात्र उत्सव मंडळ, कै. नितीन गवळी मित्र परिवार आणि एस.एम.एच. कराड यांच्यावतीने शिवाजी स्टेडियमवर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मैदानावर फलंदाजी करत, क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, कार्वे गावचे सरपंच संदीप भांबुरे, उपसरपंच रोहित जाधव, माजी उपसरपंच वैभव थोरात, अधिकराव गुजले, राजू मुल्ला, उमेश शिंदे, रमेश मोहिते, सचिन पवार, राहुल थोरात, हर्षवर्धन शिंदे, अभिजीत वायदंडे, भास्कर देसाई, विनायक घेवदे यांच्यासह कराड येथील आदियामा स्पोर्टस् क्लब, सहारा स्पोर्टस, एस.पी. स्पोर्टस, के. के. इलेव्हन, एकता स्पोर्टस, मलकापूर येथील शिवप्रेमी स्पोर्टसचे खेळाडू व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------
कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552, rajusanadi@gmail.com

Comments
Post a Comment