कराडच्या पाणीपट्टी आकारणीबाबत तूर्तसा कोणताही निर्णय नाही;मुख्याधिकारी रमाकांत डाके...

 

कराडच्या पाणीपट्टी आकारणीबाबत तूर्तसा कोणताही निर्णय नाही;मुख्याधिकारी रमाकांत डाके...

कराड दि.30-(प्रतिनिधी) कराड शहरात पाणीपट्टी आकारणीवरून चांगलाच वाद पेटला असून या बाबत विविध पक्षांसह 10 संघटनांनी पाणीपट्टी आकारणी बाबत निवेदन नगरपालिकेकडे दिले आहेत. यावर आज संबंधितांना वेगवेगळ्या वेळा चर्चा करण्यासाठी दिल्या होत्या. मात्र काही चर्चा अपूर्ण असताना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी पाणीपट्टी आकारणीत 15 टक्के सवलत देण्याची घोषणा केल्याने नगरपालिकेत गोंधळ उडाला. यावर काँग्रेससह बाळासाहेबांची शिवसेनेने आक्षेप व आक्रमक भूमिका घेतल्याने मुख्याधिकारींनी पाणीपट्टी आकारणी बाबत तुर्तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसून 6 फेब्रुवारी रोजी सर्व निवेदन धारकांना एकत्रित बोलावून चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कराड शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाणीपट्टी मीटर प्रमाणे आकारण्यात येऊ लागली. मात्र त्यानंतर पाणीपट्टीचे आलेल्या बिलावरून शहरातील नागरिकांनी या पाणीपट्टी विरोधात आक्रमक भूमिका घेत सदरची पाणीपट्टी ही अवास्तव अवाजावी व अधिक असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

पाणीपट्टी आकारणी वरून हा सुरू झालेला वाद संबंधितांशी चर्चा करून सोडवण्यात येईल असे सांगितल्यानंतर ज्यांनी ज्यांनी याबाबत निवेदन सादर केले आहेत त्यांना आज मुख्याधिकारी यांनी चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी राष्ट्रवादी व लोकशाही आघाडीने पाणीपट्टी आकारणी मध्ये वाटप करण्यात आलेल्या बिलामध्ये 20 टक्के सवलत देण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकार्‍यांनी चर्चा करून 15 टक्के सवलत देत असल्याचे माध्यमांसमोर जाहिर केले.

दरम्यान बोलवलेल्या वेळेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आजी-माजी नगरसेवकांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये मुख्याधिकारींबरोबर बराच वेळ खडाखडी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी बिलात 30 टक्के सवलत देण्याची मागणी केली. यावेळी चर्चे दरम्यान वादाचा प्रसंग निर्माण झाला. माजी नगरसेवक श्रीकांत मुळे व मुख्याधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. 

सध्याच्या पाणीपट्टी सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नसून हा एक प्रकारचा बूरदंड बसत आहे. वाढीव पाणीपट्टीमुळे नागरिकांना फटका बसत आहे, ही बाब काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिली व पाणीपट्टी आकारण्यात 30 टक्के  सवलत देण्यात यावी अशी मागणी मागणी करत काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या मागणीवर ठाम राहत नागरिकांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी पुढाकार घेतला.

इतर निवेदनावर ही चर्चा झाल्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी सर्व निवेदन धारकांना चर्चेसाठी मुख्याधिकाऱ्यांनी एकत्रित बोलवल्यामुळे व काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे नागरिकांना पाणीपट्टी सवलतमध्ये नक्कीच दिलासा मिळणार आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक