कराडात देशभक्तिपर समूह गीत-गायन स्पर्धांना प्रारंभ...
कराडात देशभक्तिपर समूह गीत-गायन स्पर्धांना प्रारंभ...
कराड दि 24- प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील आदरणीय पी.डी.पाटील गाैरव प्रतिष्ठानच्यावतीने घेतल्या जाणार्या ' देशभक्तिपर समूह गीत- गायन स्पर्धांना आज प्रीतीसंगम बागेत प्रारंभ झाला.
दाेन दिवस हाेणार्या या स्पर्धांमध्ये आज कराड नगर परिषद व संस्थांच्या प्राथमिक शाळांच्या स्पर्धा आनंदी वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. अशाेकराव गुजर यांचे हस्ते झाले.यावेळी विश्वस्त ऍड. मानसिंगराव पाटील, साै रेश्मा काेरे, संयाेजन समिती सदस्य प्रा. एस्. ए. डांगे, प्रा.रामभाऊ कणसे, संभाजीराव पाटील, नरेंद्र तथा प्रकाश पवार, अबुबकर सुतार उपस्थिती हाेते.
आजच्या स्पर्धेमध्ये १० शाळांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये कराड नगरपरिषद शाळा क्र. ३,७,९ व १२ तसेच आदर्श प्राथमिक शाळा, प्रॅक्टिंसींग स्कूल, कै.का.ना.पालकर आदर्श प्राथमिक शाळा, ऍकडमी हाईटस् स्कूल, वेणूताई इंग्लिश मिडीयम स्कूल व संजीवनी इन्स्टिट्युटची मतिमंद मुलांची शाळा आदि शाळांचा सहभाग हाेता.
परिक्षक म्हणून अशाेकराव कुलकर्णी (कडेगांव), प्रकाशराव बापट व साै गिता दातार (सांगली) यांनी काम पाहिले. स्पर्धांच सुत्रसंचालन प्रा.एस्. ए. डांगे यांनी केले. आभार प्रा.रामभाऊ कणसे यांनी मानले.
कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552, rajusanadi@gmail.com
Comments
Post a Comment