कराडच्या पांडुरंग करपे यांना यंदाचा कराड गाैरव पुरस्कार जाहीर...

 


कराडच्या पांडुरंग करपे यांना यंदाचा 'कराड गाैरव पुरस्कार' जाहीर...

कराड दि.25-येथील आदरणीय पी.डी.पाटील गाैरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा कराड गाैरव पुरस्कार येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, प्रसिध्द मंडप व्यावसायिक पांडुरंग जयसिंग करपे यांना त्यांच्या उल्लेखनिय समाजकार्या बद्दल जाहीर झाला आहे. 

प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आ. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत पांडुरंग करपे यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डाॅ. अशाेकराव गुजर, विश्वस्त ऍड.मानसिंगराव पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, साै रेश्मा काेरे, साै शाेभा पाटील व अबुबकर सुतार यांची उपस्थिती हाेती.

पांडुरंग करपे हे सातारा जिल्हा बुरुड समाजाचे उपाध्यक्ष असून अनेक संस्थांवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक शिक्षण संस्थांना आर्थिक सहकार्य केले आहे. त्यामध्ये जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल शिरढाेण जि.सांगली व वर्ये जि.सातारा, शिक्षण मंडळ कराड तसेच, शालेय विद्यार्थ्यांना शालेय व गणवेश वाटप, मूक बधीर विद्यालय यांना आर्थिक मदत व खाऊ वाटप, मतिमंद मुलांच्या शाळांना आर्थिक मदत, तसेच अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे

 २००० साली बुरूड समाजाचे अधिवेशन, कराडमधील वेश्यांना एडसविषयी मार्गदर्शन व एक वेळचं जेवण, इंडियन लेप्रसी फाऊंडेशन अंधेरी मुंबई या संस्थेस आर्थिक मदत, अनेक ठिकाणी वृक्षाराेपण, व्यसनमुक्तिसाठि प्रयत्न, समाजासाठी वधू-वर सूचक मेळावे, शासकिय रिमांडहाेम मधील विद्यार्थ्यांना खाऊ व कपडे वाटप, दुष्काळामध्ये साेहाेली जि.सांगली येथील जनावरांच्या छावणीत चारा पाेहचविणे, श्री आळंदी ते पंढरपूर पालखी साेहळ्यात तरडगांव मधील सर्वांना अन्नदान,

राेटरी क्लब कराड सुंदर अक्षर व वक्तृत्व स्पर्धांचे प्रायाेजक म्हणून काम, कराडमधील वृध्दांना बसणेकरिता १०० ठिकाणी सिमेंट बाकांची व्यवस्था असे समाजकार्य केले आहे व करीत आहेत. त्यांना अनेक संस्थांनी पुरस्काराने गाैरविले आहे. त्यामध्ये दैनिक तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांचे हस्ते, कृष्णाबाई उत्सव कमेटी, कै बाबासाहेब चाेरेकर स्मृति सामाजिक पुरस्कार, बुरुड समाजाच्यावतीने खासदार चंद्रकांत खैरे यांचे हस्ते सत्कार, यशवंत बॅंक महाेत्सव हभप बाबामहाराज सातारकर यांचे हस्ते ह्रदय सत्कार, महाराष्ट्र शासनाचा दलित मित्त पुरस्कार,  यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दि पुरस्कार, जानाई शिक्षण संस्थेचा शिवकला गाैरव पुरस्कार, राष्ट्रशाही अमर शेख पुरस्कार आदि पुरसकार तसेच, बुरुड समाज मंडळ कराड व केतय्यास्वामी प्रतिष्ठान पुणे यांचेकडून सन्मानपत्र प्रदान करणेत आले आहे.कराड गाैरव पुरस्कार हा पांडुरंग करपे यांना मार्च २०२३ अखेर समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक