खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण, जावळी तालुक्यात मोबाईल टाॅवरला मान्यता....


 खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण, जावळी तालुक्यात मोबाईल टाॅवरला मान्यता....

कराड दि.24-सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने पाटण व जावळी तालुक्यातील आणखी सहा गावात मोबाईल टॉवरला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेली बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी लोकसभेत आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नातून या अगोदरच जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील 166 गावात टॉवर मंजूर झाले आहेत. आता आणखी पाटण, जावली व सातारा तालुक्यातील 7 टॉवरला मंजूरी मिळाली आहे. पाटण व जावली व सातारा तालुक्यातील दुर्गम भागातील मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी पाटण तालुक्यातील कारळे, गलमेवाडी, सळवे, ऊरुल  आणि जावली तालुक्यातील फाळणी, वाघदरे व सातारा तालुक्यातील पारंबे गावांसाठी बीएसएनएलचे मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. अशी मीहिती खा.श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 

सातारा जिल्हा हा डोंगररांगामध्ये विखुरला गेला आहे. आजच्या इंटरनेट युगात येथील बीएसएनएलचे नेटवर्क पिछाडीवर पडले आहे. दुर्गम आणि डोंगरी भागात बीएसएनएलची सेवा तेवढी प्रभावीपणे मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बनलेल्या मोबाईल सेवेअभावी स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पहाता मोबाईल टॉवरची गरज लक्षात घेऊन खा.श्रीनिवास पाटील त्यासाठी प्रयत्नशील असून सदर टॉवरला मंजूरी मिळाली आहे.

कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552, rajusanadi@gmail.com




Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक