शिक्षण मंडळाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांच्या अफलातून कलाकृतीस उत्सफूर्त प्रतिसाद....
शिक्षण मंडळाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांच्या अफलातून कलाकृतीस उत्सफूर्त प्रतिसाद....
कराड दि.22-माणूस आणि निसर्ग यांचे असणारे अद्वितीय नाते, बोबडे बोल, प्रभावी शब्दफेक व लटपटणा-या पावलांनी नूतन मराठी शाळेच्या बालचमुंनी आपल्या नृत्यातून दाखवून दिले.
येथील शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव समारंभात नूतन मराठी शाळेच्या वतीने आयोजित निसर्ग माझा प्राण या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात बहारदार सादरीकरण केले . यावेळी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, तसेच माजी मुख्याध्यापिका श्रीमती इंदु जोशी, प्रभा जोशी, मीरा जोशी, माजी लिपिक सौ. चौकर बाई मुख्याध्यापिका उर्मिला कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात निसर्ग माझा प्राण या संकल्पनेवर आधारित विविध गीते, नृत्ये, नाटयछटा सादर करण्यात आल्या. यामध्ये फुलपाखरु छान किती दिसते, हिरव्या हिरव्या डोंगरावर चला जाऊया, झुंजू मुंजू पहाट झाली, वाऱ्यावरती गंध पसरला, चिउताई चिउताई, टप टप पडती, बादल पे पाव है, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी, सोनेरी उन्हात, टिक टिक प्लॅस्टिक, बरसो रे मेघा, काश्मीर तू, मै कन्याकुमारी, इतनीसी हसी इतनीसी खुशी, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर, सुंठेला कोकणी वार गो, जागो जागो बकरे, देस रंगीला इत्यादी बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगीता देसाई, प्रियांका माने, सौ शेलार, स्मिता पाटील यांनी केले. आभार मुख्याध्यापिका उर्मिला कांबळे यांनी मानले.
महाराष्ट्राच्या लोकनृत्य गीत सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध...
येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध कलाविश्काराने उपस्थितांना ठेका धरायला लावला. महाराष्ट्राच्या लोकनृत्याच्या बहारदार गीत सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
निमित्त होते येथील टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे. समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण मंडळाचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, कौन्सिल सदस्य सुधीर घाटे, प्राचार्य जी. जी. अहिरे, उपप्राचार्य धनाजी देसाई, पर्यवेक्षक राजेश धुळूगडे, सांस्कृतिक विभागप्रमुख सुखदा विदार यांची उपस्थिती होती.
टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुमारे चारशे विद्यार्थीनींनी गणेश वंदना, लावणी, भारुड, गोंधळ, विविध देशभक्तीपर गीते, छत्रपती शिवरायांचा पराक्रम, स्त्रियांच्या शौर्यगाथा, याचबरोबर विविध लोकनृत्ये सादर केली. उपस्थितांनी या सर्वच गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशातील विविध राज्यातील लोकनृत्यांचे बहारदार सादरीकरण विद्यार्थिनींनी केले.
कु. तनुजा तुपे व कु. दिक्षा चव्हाण आदर्श विद्यार्थीनी म्हणून यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुखदा विदार व प्रा. सुनिता कोळी यांनी मार्गदर्शन केले. प्रा. कविता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस वाय कोळी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment