राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कु. प्राची देवकरला डॉ. अतुल भोसलेंचे पाठबळ...


राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती कु. प्राची देवकरला डॉ. अतुल भोसलेंचे पाठबळ...

किरपे येथे विशेष नागरी सत्कार; भविष्यातील वाटचालीसाठी आर्थिक सहकार्य...

कराड, दि.24- नॅशनल क्रॉस कंट्रीमध्ये सुवर्णपदक पटकावित, खेलो इंडिया स्पर्धेत निवड होण्याची कामगिरी किरपे (ता. कराड) येथील कु. प्राची अंकुश देवकर हिने करून दाखविली आहे. किरपेसारख्या छोट्याशा गावातून पुढे येत राष्ट्रीय पातळीवर यश पटकविणाऱ्या कु. प्राचीचा विशेष नागरी सत्कार करत, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी तिला भविष्यातील वाटचालीसाठी आर्थिक मदत करत पाठबळ दिले आहे. 

आसाम येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल क्रॉस कंट्रीमध्ये कु. प्राची अंकुश देवकर हिने सुवर्णपदक पटकाविले असून, तिची खेलो इंडिया स्पर्धेत निवड झाली आहे. तिच्या या सुवर्णकामगिरीबद्दल किरपे ग्रामस्थांच्यावतीने विशेष नागरी सत्कार करण्यात आला. डॉ. भोसले यांच्या हस्ते कु. प्राची हिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.  तसेच किरपे गावचेच सुपुत्र मंगेश कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री. कांबळे यांच्यावतीने त्यांचे वडील शिवाजी कांबळे यांनी सत्कार स्वीकारला.

याप्रसंगी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, प्राचीने अवघ्या १४ मिनिटे ५० सेकंदात ४ किलोमीटरचे अंतर पार करून थक्क करणारी कामगिरी करून दाखविली आहे. किरपे येथील आमच्या सामान्य कार्यकर्त्याची मुलगी उत्कृष्ट धावपट्टू बनते, याचा मला मनस्वी आनंद आहे. ग्रामीण भागातील सामान्य मुले - मुली क्रीडा क्षेत्रात पुढे यावीत, यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेलो इंडिया मोहीम सुरू केली असून, प्राचीने अशीच कामगिरी करत भविष्यात देशाच्यावतीने ऑलम्पिकमध्ये सहभागी व्हावे.

यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, विद्याधर देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कृष्णा कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे, सरपंच प्रज्ञा देवकर, माजी सरपंच संदीप माने, रमेश देवकर, शिवाजी देवकर, श्रीकृष्ण देवकर, जयवंतराव देसाई, शंकर माने, मानसिंग देवकर, भगवान कांबळे, संताजी देवकर, आणे गावचे सरपंच किसनराव देसाई, उपसरपंच सागर पाटील, दादासाहेब देवकर, प्रतापराव देवकर, बाजीराव शेवाळे, सतीश माने यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552, rajusanadi@gmail.com


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक