कराड नगरपरिषदेंकडून मकर संक्राती निमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन...
कराड नगरपरिषदेंकडून मकर संक्राती निमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन...
कराड दि.22-कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने खास कराड शहरातील महिलांसाठी मकर संक्राती निमित्त स्नेह मेळावा व वाण वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती या विभागाच्या व्यवस्थापक दिपाली दिवटे यांनी दिली.
मंगळवार दि. २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता कराड नगरपरिषदेच्या प्रंगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जास्तीत जास्त महिलांनी स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.
Comments
Post a Comment