कराडात आईच्या निधनानंतर तेरावा झाला अन पिग्मी एजंट मूलाने आत्महत्या केली..
कराडात आईच्या निधनांनतर तेरावा झाला अन पिग्मी एजंट मूलाने आत्महत्या केली...
कराड दि.22 (प्रतिनिधी) दीर्घ आजाराने व वयोमानामुळे आईचे निधन झाले. आईच्या निधना नंतर तेराव्याचा विधी पार पडला.अन दूसर्या दिवशीच मूलांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कराडात घडली आहे. पिग्मी एजंट म्हणून काम करणार्या या अविवाहित मूलांने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबत कराड शहर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. त्याबाबत मिळालेल्या माहितीनूसार सोमवार पेठेत 2000 प्लाझा येथे अजित प्रभाकर करंदीकर (वय-34) हा आपला मोठा भाऊ व आई समवेत राहत होता. वयोमानामुळे आईचं निधन झालं. आईच्या निधनामुळे अजित व त्याचा भावाने सर्व विधी सोपस्कर पार करीत तेरावा ही घातला. त्यानंतर दूसर्या दिवशी (काल शनिवार दि.21 जानेवारी) दूपार नंतर अजितने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला या प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्याने याबाबत पोलिसात कळवले.
अजित हा शहरातील नामवंत बॅंकेचा पिग्मी एजंट म्हणून काम करीत होता. वडीलांचे निधन झाल्यानंतर अजित आपल्या आई व भावासह राहत होते. आईच्या निधनानंतर तेराव्याचा विधी झाल्यानंतर अजितने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन त्याने हे टोकाचे का पाऊल ऊचलले याचा तपास कराड शहर पोलिस करीत आहेत.
--------------------------------------------------
कराड टुडे आॅनलाईन न्यूज व कराड टुडे न्यूज चॅनेलसाठी बातम्या व जाहिरातींसाठी सपंर्क-राजू सनदी, कराड-9822308552, rajusanadi@gmail.com


Comments
Post a Comment