कराडात चिंगळे बंधू मिरची मसाला ट्रेडर्सच्या हळदीकुंकू समारंभास महिलांचा मोठा प्रतिसाद...
कराडात चिंगळे बंधू मिरची मसाला ट्रेडर्सच्या हळदी कुंकू समारंभास महिलांचा मोठा प्रतिसाद...
कराड दि.21 (प्रतिनिधी) मकर संक्रांती निमित्ताने येथील प्रतिथयश चिंगळे बंधू मिरची मसाला ट्रेडर्सचे मालक सोमनाथ चिंगळे (काका) यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभास शहर व परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील मार्केट यार्ड (गेट नं.2) येथे असणारे चिंगळे बंधू यांचे मिरची मसाला ट्रेडर्स मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या हळदी कुंकू समारंभात सहभागी झालेल्या महिलांना सोमनाथ चिंगळे परिवाराकडून भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने दूकानांत महिलांना सहज व अचूक निवडक मसाले व अन्य आॅग्रॅनिक पध्दतीचे पदार्थ, मसाल्यात वापरण्यात येणारी विविध पदार्थ, लोंचे, मसाला पॅकेट याची माहिती व्हावी या उद्देशाने मांडण्यात आली होती. याची माहिती अभिषेक चिंगळे यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिली.
या हळदीकुंकू समारंभाचा प्रारंभ पार्वती चिंगळे, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, सौ. रोहिणी शिंदे डॉ. तेजस्विनी पाटील, सौ. रश्मी एरम, माजी नगरसेविका सौ.पल्लवी पवार, संगीता शिंदे, कोयना बँकेच्या संचालिका विना देशपांडे, सौ.उमा हिंगमिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आला.
यावेळी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या सर्व मान्यवर महिलांचे तसेच ग्राहकांचे सौ उज्वला चिंगळे, दीक्षा चिंगळे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. ज्योती चिंगळे यांनी केले तर अभिषेक चिंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिंगळे परिवार तसेच दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment