Posts

Showing posts from October, 2023

कराडच्या त्या स्फोटातील जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू...

Image
  कराडच्या त्या स्फोटातील जखमी महिलेचा अखेर उपचारा दरम्यान मृत्यू... . राजू सनदी, कराड  कराड दि.31 (प्रतिनिधी) येथील मुजावर कॉलनीत आठ दिवसापूर्वी शरीफ मुल्ला यांच्या घरात अचानक झालेल्या स्फोटामुळे जखमी झालेल्या पैकी सुलताना मुल्ला (वय 33) या महिलेचा येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 25 ऑक्टोंबर रोजी मुजावर कॉलनीत शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळी अचानक स्पोट झाला. या स्फोटामुळे त्यांच्या घरासह परिसरातील अन्य पाच घरांचे नुकसान झाले. याशिवाय सहा दुचाकींचे नुकसान झाले. तसेच या स्फोटामुळे तीन घरातील सात जण जखमी झाल्याची घटना घडली होती. हा स्पोट झाल्यानंतर सातारा पुणे व अन्य ठिकाणाहून फॉरेन्सिक चाचणी पथक बोलवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही या हा स्फोट नेमका कशाने झाला याची अद्याप माहिती संबंधित प्रशासनाने जाहीर केली नव्हती मात्र हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस विभागाने वर्तवला होता. या स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या घरातील दोन लहान मुलासह त्यांच्या पत्नी व नजीकच्या घरातील अन्य तीन ते चार जण जखमी झाले होते. या जखमीवर करा...

काले गावच्या हद्दीत एसटी दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू...

Image
काले गावच्या हद्दीत एसटी दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू... कराड दि. 31 (प्रतिनिधी) कराड उंडाळे रोडवर काले गावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या ठिकाणी रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीची व एसटीची धडक होऊन दुचाकी वर पाठीमागे बसलेल्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. घटनास्थळावर वाहतूक विस्कळीत झाली असून नांदगाव आ.पोस्टचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुचाकी वरील इसम धोंडेवाडी येथील असून चंद्रकांत भोसले (वय 50) असे त्यांचे नाव आहे. दुचाकीस्वार रस्ता क्रॉस करत असताना कराड कडे येणाऱ्या कराड आगाराच्या एसटीची धडक बसून दुचाकीवर पाठीमागे बसलेली व्यक्ती रस्त्यावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचे नुकसान झाले आहे. अपघात कालेगावच्या हद्दीत डाळिंबीची बाग या चौकात झाला आहे.

रेठरे बुद्रुक येथे सरपंच पदाचे उमेदवार आबा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला...

Image
रेठरे बुद्रुक येथे सरपंच पदाचे उमेदवार आबा सूर्यवंशी यांच्यावर  हल्ला... रेठरे बुद्रुकच्या गावाच्या नावलौकिकाला गालबोट लावणारी घटना.. . कराड दि.29-रेठरे बुद्रुक गावाची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली असून सरपंच पद खुल्या प्रवर्गाला जाहीर झाले आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून गावात सरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच सुरु झाली आहे. यावेळी कराड दक्षिण चे आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या गटाचे सरपंच पदाचे उमेदवार दिग्विजय (आबा) अशोकराव सूर्यवंशी  तसेच अतुल भोसले गटाचे उमेदवार हणमंत बाबुराव सूर्यवंशी या दोन सख्ख्या चुलत्या पुतण्यात हाय व्होल्टेज लढत होताना दिसून येत आहे.  अशा परिस्थितीत भोसले गटाचे समर्थक हेमंत पांडुरंग धर्मे यांनी सरपंच पदाचे उमेदवार आबा सूर्यवंशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना रेठरे बुद्रुक येथील बालाजी नगर परिसरात प्रचार करताना फिरत असताना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी उमेदवार आबा सूर्यवंशी यांनी गावाच्या विकासासाठी अशा धमकींना बळी पडणार नाही व हुकूमशाहीला प्रतिकार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे म्हणत प्रचार चालूच ठेवला व साथीच्या उमेदवारां...

कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला...

Image
कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला... कराड दि.28- कोयना धरण परिसरात गेल्या १२ दिवसात तिसऱ्यांदा भूकंपाचा धकका जाणवला असुन आज रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरण परिसर हादरला आहे. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून साडेनऊ किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली असून आज रात्री झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून साडेनऊ कि मि अंतरावर गोषटवाडी गावच्या हद्दीत साडेसात किलोमीटर खोलीवर होता. अशी माहिती संबंधित भूकंप मापन केंद्रातून देण्यात आली.

कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून बोगस नंबरप्लेटची चोरीची बुलेट ताब्यात...

Image
कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून बोगस नंबरप्लेटची चोरीची बुलेट ताब्यात... कराड दि.28- शहरात नियमित वाहतूकीच्या कामासंदर्भात कामकाज सुरू असताना संशयस्पद आढळून आलेल्या मोटरसायकलची चौकशी केली असता संबंधित मोटरसायकल चोरीची निघाली असून त्या संदर्भात कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवालदार अमोल तातोबा पवार यांना तसेच होमगार्ड जंगम यांना शुक्रवारी कराड शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमण्यात आले होते. सदर वेळी वाहतूक नियमन व वाहन चेकिंग करीत असताना संबंधित अमलदार यांनी समोरून येणारे ब्लॅक कलरची बुलेट वरील चालक यांना इशारा करून बाजूला घेतले, सदर चालकास त्याचे नांव व बुलेट बद्दल, तसेच तिचे कागदपत्राबाबत माहिती विचारली असता सदर चालक याने आपले नाव सलीम ईलाही डांगे वय 48 वर्षे, व्यवसाय वाहन खरेदी-विक्री रा. मसुर, जि सातारा असे सांगून बुलेटबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बुलेट चारीची असावी असा संशय निर्माण झालेमुळे सदर बुलेट बाबत आरटीओ कार्यालय, कराड येथून पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली असता, सदर ब...

स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हाॅल नगरपरिषदेच्या ताब्यात; निविदा काढून नागरिकांसाठी वापरात आणणार...

Image
  स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय हाॅल नगरपरिषदेच्या ताब्यात; निविदा काढून नागरिकांसाठी वापरात आणणार... कराड दि.27- कोविड सेंटरसाठी वापरण्यात आलेला यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल संबंधित विभागाकडून अखेर तीन वर्षानंतर नगरपरिषदेकडे सुपूर्द झाला आहे. त्यामूळे नगरपरिषदेने हॉलची स्वच्छता व दुरुस्ती करून ते वापरात आणण्याची तयारी सूरू केली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण नगरपरिषदेत आल्यानंतर नगर अभियंता आर डी गायकवाड यांनी त्यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर व संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर हा हॉल प्रांताधिकारी यांनी नगर परिषदेच्या ताब्यात दिला असून आता हा प्रशस्त हॉल नागरिकांना वापरासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती नगर अभियंता आर डी गायकवाड यांनी दिली. सदर हॉल गेली तीन वर्षहून अधिक काळ कोविड सेंटरसाठी वापरण्यात आला होता. या काळात नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. सप्टेंबर 2020 मध्ये या हॉलचे रूपांतर कोविड सेंटर मध्ये केल्यानंतर पहिल्या लाटेत काही काळ हाॅलचा वापर झाला. मात्र दुसऱ्या लाटेत या हॉलचे रूपांतर संपूर्णपणे कोविड हॉस्प...

सातारा रत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित...

Image
  सातारा रत्न पुरस्काराने डॉ.सुनील तांबवेकर सन्मानित... कराड, दि.२६: मुंबई येथील आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने वाडिया मॅटर्निटी हॉस्पिटल, सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालय, के.ई.एम.रुग्णालय, परळ, मुंबई येथील सिनियर असिस्टंट प्रोफेसर, स्त्रीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूती शास्त्र तज्ञ व एंडोस्कोपिक सर्जन डॉ.सुनील एकनाथ तांबवेकर यांना सातारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.सुनील तांबवेकर हे मुळचे घोगाव, ता.कराड येथील रहिवासी आहेत. सातारा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. दादर येथील शिवाजी मंदिर येथे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई आणि परिसरातील सातारकरांसाठी असलेल्या संकल्पित सातारा भवनचे शानदार उद् घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सेवागिरी संस्थान पुसेगाव महंत सुंदरगिरी महाराज, प्रा.यशवंत पाटणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना निकम, माजी आमदार आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाबुराव माने, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ.सुभाष ...

कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांना सातारा भूषण पुरस्कार...

Image
  कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांना सातारा भूषण पुरस्कार... कराड दि.26-आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सातारकरांना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल सातारा रत्न - भूषण पुरस्कार प्रदान केला जातो. सन २०२३ साठीचा बँकिंग विभागातील गौरवास्पद कार्याबद्दलचा सातारा भूषण पुरस्कार कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांना परम पूज्य सेवागिरी महाराज मठ पुसेगावचे मठाधिपती श्रीमंत सुंदरगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रदान केला. सोमवार दि. २३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट शिवाजी मंदिर सभागृहामध्ये सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष राजाराम निकम व सहकारी तसेच सीए. दिलीप गुरव यांच्यासमवेत कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व अध्यक्ष डॉ. सुभाष एरम हे उपस्थित होते. सीए. दिलीप गुरव सन १९९६ साली कराड अर्बन बँकेच्या सेवेत उपमुख्य कार्यकारी या पदावर रूजू झाले. कार्यतत्परता, अचूक व धाडसी निर्णय, बँक...

कराड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; 6 मोटार सायकली जप्त, दोघांना अटक....

Image
  कराड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; 6 मोटार सायकली जप्त, दोघांना अटक.... राजू सनदी कराड टुडे न्यूज नेटवर्क  कराड दि.21-पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे व डीबी पथकाने दोन मोटर सायकल चोराच्या मुसक्या आवळत एकुण 6 मोटर सायकल जप्त करुन 2,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व पथक यांनी त्यांचे कौशल्य पुर्ण तपासाचे जोरावर तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराचे मदतीने दोन संशयीत इसमांना नागठाणे येथुन ताब्यात घेतले. त्यातील एक इसम हा सातारा जिल्यातील तडीपार व दुसरा सराईत मोटर सायकल चोर असतांना देखील पोलीस उप निरीक्षक डांगे यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन आरोपीना बोलते केले. सदर कारवाईत आरोपी कडुन कराड शहर पोलीस ठाणेचे हद्दीतील विविध भागातुन चोरी झालेल्या मोटर सायकल चोरीचे सहा गुन्हे उघड करण्यात आले आहेत. नमुद गुन्हयात आरोपी जय अशोक सांळुखे रा. नागठाणे ता.ज...

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांची अंमली पदार्थ धंदयावर धडक कारवाई...

Image
  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांची अंमली पदार्थ धंदयावर धडक कारवाई... कराड तालुक्यातील म्होप्रे येथे गांजाची लागवड; सव्वा लाखाचा गांजा जप्त... राजू सनदी कराड टुडे न्यूज नेटवर्क  कराड दि.21- सातारा जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक प्रभावी कामगिरी करणेबाबत वरिष्ठांनी सुचना केल्या आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देऊन मिळालेल्या माहितीवरून  म्होप्रे ता. कराड येथून ५ गांजाच्या झाडासहीत ११.८७० कि. ग्रॅ. वजनाचा १,२६,९२०/- रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. तर एकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांना बातमीदारा मार्फत दि. २०/१०/२०२३ रोजी बातमी मिळाली की, म्होप्रे ता. कराड येथील सोमनाथ पांडुरंग जाधव याने म्होप्रे बेघर वसाहतीचे शेजारील त्याचे मालकीचे शेतात गांजा पिकाची लागवड केली आहे. अशी बातमी मिळालेने त्यांनी पो. नि. विजय पाटील, पोउनि राजेंद्र पुजारी, स. फौ. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, प्रविण...

सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत सर्व शैक्षणिक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा...

Image
सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत सर्व शैक्षणिक संघटनाच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा... कराड दि.20:-सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत सर्व शैक्षणिक संघटना यांच्या वतीने आज कराड येथे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण प्रलंबित प्रश्नाबाबत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी पुतळाला अभिवादन करुन करण्यात आली. महात्मा गांधी ते तहसील  कार्यालय पर्यंत कार्यालय पर्यंत शिक्षक, विद्यार्थी, संस्था  चालक या मोर्चात सहभागी झाले होते.यावेळी संस्था चालक संघटना व शैक्षणिक संघटना यांच्या   वतीने तहसीलदारांना अशोकराव थोरात, सचिन नलवडे व सर्व प्राथमिक , माध्यमिक शिक्षक , शिक्षकेत्तर संघटनांचे व संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष, सचिव पदाधिकारी यांनी निवेदन दिले. या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष द्यावे यामध्ये गेल्या बारा वर्षापासून शाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदे न भरल्यामुळे सर्व शाळा समोर गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑक्टोबर ...

पोलीस व महसूल विभागाने निवडणुकीसाठी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी...

Image
  पोलीस व महसूल विभागाने निवडणुकीसाठी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी... सातारा, दि.17:निवडणुकीच्या काळात महसूल व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे तसेच या दोन्ही विभागांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात एकही संवदेशिल मतदान केंद्र नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, कोणत्याही मतदान केंद्रावर अनूचित प्रकार घडणार नाही, मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सर्व मतदान केंद्रांचे वस्तुनिष्ठ माहिती घेऊन महसूल व पोलीस विभागाने त्यांचे सर्व्हेक्षण करावे. मतदान केंद्रांवर का...

पोक्सो गुन्ह्यातून तरुणाची निर्दोष मुक्तता; ॲड. पृथ्वीराज पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य...

Image
पोक्सो गुन्ह्यातून तरुणाची निर्दोष मुक्तता; ॲड. पृथ्वीराज पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य... कराड दि.15-कराड शहर पोलीस स्टेशन हद्दीत 2021 साली एका गावात तरुणीला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा गुन्हा शहर पोलिसात पोक्सो अंतर्गत दाखल झाला होता. या गुन्ह्याचा खटला येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाला होता. न्यायालयात नुकताच या खटल्याचा निकाल लागला असून पोक्सो गुन्ह्यातील आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात आरोपीच्या वतीने ॲड. पृथ्वीराज पाटील यांनी युक्तिवाद केला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल ताराचंद चव्हाण (वय 21) या तरुणावर एका अल्पवयीन तरूणीला हात पाय बांधून खेचत नेऊन चाकूचा धाक दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असा कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये भा. द. वी. स. कलम 376 ( 3 ),354 पॉक्सो अॅक्ट 3/4,7 / 8, 11/12 अन्वये 2021 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तपास अधिकारी सहा. पो. नि. दूधभाते यांनी हा गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला सादर केला होता. सदरचा खटला हा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी चालला ह...

कराडात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून स्वच्छता मोहीम...

Image
  कराडात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून स्वच्छता मोहीम... कराड दि.15-भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने कराड नगरपालिकेच्या स्वच्छ कराड, सुंदर कराड आणि उज्जीवन बँकेच्या स्वच्छ नेबरहुड या उपक्रमात अंतर्गत येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 7 व 12 येथे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक कराड शाखेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या कराड शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी कराड नगरपरिषद शाळा क्रमांक 7 व 12 व परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक संकपाळ सर, स्टाफ व विद्यार्थी तसेच उज्जीवन बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

कराड जवळ महामार्गावर कारची ट्रकला धडक;पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू...

Image
कराड जवळ महामार्गावर कारची ट्रकला धडक;पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू... कराड दि.14-(प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून वॅगनर कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह तिघांचा समावेश आहे. हा भीषण अपघात आज शनिवारी दुपारी झाला आहे. या अपघातातील वॅगनर कार कोल्हापूरहून कराडच्या दिशेने येत होती. नितीन बापूसाहेब पोवार-34 (रा. कोल्हापूर राजवाडा), मनीषा आप्पासाहेब जाधव-31 आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा . जरळी, ता. गडहिंग्लज, जि . कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार, पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा नजीकच्या हॉटेल भाग्यलक्षीनजीक महामार्गावर डाव्या बाजूला ट्रक उभा होता. साधारण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडून कराड कडे जाणाऱ्या वॅगनर कारने (क्र. एम. एच. 01 ए. एल. 5458) मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात कारमधील दोन पुरूष आणि एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये कोल्हापूरच्या ...

कराड शहरातील रिक्षा चालकांच्या बेकायदेशीर वागण्यामुळे जनतेच्या जीवितास धोका; मीटर प्रमाणे भाडे आकारणी व्हावी...

Image
  कराड शहरातील रिक्षा चालकांच्या बेकायदेशीर वागण्यामुळे जनतेच्या जीवितास धोका; मीटर प्रमाणे भाडे आकारणी व्हावी... राजू सनदी, कराड  कराड दि.12-कराड शहर व परिसरातील रिक्षा चालकांच्या बेबंद बेकायदेशीर वागण्यामुळे जनतेच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच कराड शहर व परिसरात मिटर नुसार रिक्षा भाडे जाहिर होणेबाबत आणी मिटरचे दर जनतेला समजणेबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी आपले कराड ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी केली आहे.  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संजय चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, कराड शहर व कराड शहरालगतच्या गावात हजारो रिक्षा आहेत. परंतु यांच्यावर कोणाचेही शासकीय नियंत्रण नसल्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष उसळत आहे. हे रिक्षाचालक बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे पुर्ण उल्लंघन करून रिक्षा चालवत असतात. तसेच सिग्नलच्या ठीकाणी सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करत असतात.तसेच रिक्षा थांब्यावर सुद्धा रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या करत असतात. या रिक्षाचालकांना शासनानेच बेबंद बेकायदेशीर वागण्याची मुभा दिली आहे की ...

कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे नवरात्र उत्सवात ९१ व्या शारदीय व्याख्यानमालचे आयोजन...

Image
  कराड नगरपालिका नगरवाचनायातर्फे नवरात्र उत्सवात ९१ व्या शारदीय व्याख्यानमालचे आयोजन... राजू सनदी कराड  कराड दि.12-कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी शारदीय व्याख्यानमालेचा उपक्रम राबविला जातो. सन १९३२ पासुन ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरु असुन यंदा ही शारदीय व्याख्यानमाला ९१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दिनांक १५ ऑक्टोंबर २०२३ पासुन या शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ होत आहे. कराडचे सांस्कृतिक, वैचारिक वैभव, शैक्षणिक संस्कारक्षम व्यासपीठ म्हणुन या व्याख्यानमाले ने नावलौकीक मिळविला आहे. १६६ वर्षाची परंपरा जपणारे हे नगरवाचनालय आज कराड शहराची शान भरली आहे. बुध्दीवंतांची गरज तर वाचनवेडया पुस्तकप्रेमी वाचकप्रेमी वाचकांची तहान भागविण्याचा झरा बनली आहे. अखंड भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि संस्मरणीय वर्ष ठरलेल्या १८५७ या वर्षामध्ये स्थापन झालेले हे नगरवाचनालय आजही आपल्या अखंड सेवेने तत्परतेने, विविधतेने, वाचकांची जिज्ञासूंची, अभ्यासूंची व्याख्यानमाला रसिकांची भूक भागविते आहे. या व्याख्यानमालेत साहित्य, संगीत, कला, क्रीडा, लोककला राजकारण काव्य, कथाकथन, धार्मीक, अध्यात्...

कराडात उद्यापासून चार दिवस एकवेळचा पाणीपुरवठा होणार नाही...

Image
कराडात उद्यापासून चार दिवस एकवेळचा पाणीपुरवठा होणार नाही... कराड दि.11-कराड शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा उद्यापासून चार दिवस होणार नसल्याची जाहीर निवेदन कराड नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. कराड शहरातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, गुरुवार दि. १२/१०/२०२३ ते दिनांक १५/१०/२०२३ या कालावधीत जलशुध्दीकरण केंद्राकडील मौजे वांरुजी यथील अशुध्द पाणी उपसा पंपगृह (जॅकवेल) मधील गाळ काढणेचे काम हाती घेणेत येणार आहे. त्यामुळे दिनांक १२/१०/२०२३ ते दिनांक १५/१०/२०२३ यादिवशी सांयकाळी होणारा पाणी पुरवठा होणार नाही. याची सर्व नागरीकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच, पाण्याचा वापर काटकसरीने करावा. व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आव्हान मुख्याधिकारी कराड नगरपरिषद यांनी केले आहे.

भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या पुरस्कार आबासाहेब शिंदे यांना जाहीर...

Image
  भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या पुरस्कार आबासाहेब शिंदे यांना जाहीर... राजू सनदी कराड कराड दि. 11 (प्रतिनिधी) दि कराड आर्किटेक्टस अॅन्ड इंजिनिअर्स असोसिएशन तर्फे भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ ५६ वा अभियंता दिनानिमित्त यावर्षीचा सर विश्वेश्वरैय्या पुरस्कार केसे ता.कराड येथील निवृत्त अभियंता आबासाहेब पांडुरंग शिंदे यांना देण्यात येणार असल्याची घोषणा असोसिएशनचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिग्विजय जानुगडे, खजिनदार चंद्रकांत पोळ, सेक्रेटरी अमित उंब्रजकर, संचालक किशोर साळुंखे, मिलींद पाटील, मकरंद जाखलेकर, राजेंद्र जाधव, प्रतिक जाधव, धैर्यशिल यादव, रोहित शर्मा, क्षितीज बेलापुरे, अजिंक्य पाटील उपस्थित होते. दि कराड आर्किटेक्टस अॅन्ड इंजिनिअर्स असोसिएशन आयोजित हा पुरस्कार वितरण समारंभ 13 ऑक्टोंबर रोजी स्व. वेणूताई चव्हाण स्मारक येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची माहिती देऊन कुलकर्णी म्हणाले की, या पुरस्कार समारंभात समृद्धी महामार्गाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. याबाबत मुख्य अभियंता एस के सुरवसे व अधीक्षक ...

कराडात घरगुती गॅसचा रिक्षात भरणा; प्रशासनाची संबंधित अड्यावर धाड....

Image
कराडात घरगुती गॅसचा रिक्षात भरणा; प्रशासनाची संबंधित अड्यावर धाड.... राजू सनदी कराड  कराड दि.10 (प्रतिनिधी) येथील कासमभाई बोर्डिंग मधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी प्रांत अधिकारी, तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांनी पोलिसांच्या मदतीने या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या धंद्यावर धाड टाकली आहे. यावेळी तीन रिक्षासह गॅस वाहतुक करणारी गाडी घटनास्थळावर आढळून आली आहे. गेली काही दिवस शहरातील मध्यवस्तीत बिन बोभाट घरगुती गॅस रिक्षामध्ये भरण्याचे काम येथे गेले काही महिन्यापासून सुरू होते. रोज अनेक रिक्षामध्ये बेकायदेशीर रित्या घरगुती गॅस भरला जात होता. याबाबत संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. मंगळवारी सकाळी प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार व पुरवठा विभागाचे अधिकारी महादेव अष्टेकर यांनी या अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली आहे. यावेळी काही रिक्षाही त्या ठिकाणी आढळून आल्या असून एक गॅस वाहतूक करणारे वाहन ही घटनास्थळावर गॅसच्या टाक्यांसह आढळून आले आहे. घटनास्थळाव...

तब्बल 2 लाखाच्या 15 मोबाईलचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश राज्यातुन कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथका कडुन शोध...

Image
तब्बल 2 लाखाच्या 15 मोबाईलचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश राज्यातुन कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथका कडुन शोध... कराड दि.9- कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व डीबी पथकाने तब्बल 2 लाखाच्या 15 मोबाईलचा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश, राज्यातुन शोध घेतला आहे. कराड शहर हे सातारा जिल्हयातील एक नामांकीत शहर व मुख्य बाजार पेठ आहे. त्यामुळे आजुबाजुचे गावातुन दररोज हजारोच्या संख्येने लोक नोकरी, रोजगार व शिक्षणासाठी कराडमध्ये येत असतात. त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व ईतर ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व पथकाने अश्या गहाळ झालेल्या मोबाईलची सायबर पोलीस ठाणेच्या माध्यमातुन माहिती प्राप्त केली. सदर माहितीचे तांत्रिक विषलेशन करुन महाराष्ट्र राज्याचे विविध भागातुन तसेच कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश हया राज्यातुन मोबाईलचा शोध घेवुन मोबाईल धारकास त्यांचे माबाईल परत केले आहेत. गरीबीची परस्थिती असताना देखील कर्ज काढुन घेतलेले मोबाईल हरवले असताना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन कराड शहर...

पाच राज्यातील निवडणुका जाहीर...

Image
  पाच राज्यातील निवडणुका जाहीर... दिल्ली.दि.9-मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा  या  पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला.  आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.  मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17,  नोव्हेंबर,  राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची  मतमोजणी 3 डिसेंबरला रोजी होणार आहे.  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही 40 दिवस पाच राज्यांचा दौरा केला. राजकीय पक्ष, केंद्र आणि राज्य सरकारांशी चर्चा केली, असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. या पाच राज्यात विधानसभेच्या 679 जागा आहेत. या पाचही राज्यात 16.14 कोटी मतदार आहेत. यात 8.2 कोटी पुरुष, 7.8 कोटी महिला आणि 60.2 लाख नवोदित मतदार आहेत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं. पाच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढल...

कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची धडक कारवाई;6 किलो गांजा जप्त...

Image
  कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची धडक कारवाई;6 किलो गांजा जप्त... कराड दि.7 (प्रतिनिधी) कराड उप विभागीय पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री पुणे बेंगलोर महामार्गावर नारायणवाडी गावच्या हद्दीत इस्लामपूर बाजू कडून सहा किलो गांजा घेऊन येणाऱ्यास सापळा रचून पकडण्यात आल्याची घटना घडली आहे याप्रकरणी एक्टिवासह 6 किलो गांजा असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हयामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक प्रभावी कामगिरी करणेबाबत वरिष्ठाकडून सुचना केले आहेत. त्यानुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिलेल्या आहेत. कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इस्लामपुर येथून एक गाडी हायवे वरुन कराड बाजुकडे येणार आहे. तरी सदर होन्डा अॅक्टिवा गाडी नंबर एम. एच. १० डी. एस. ८६६० असा असुन त्यावरून गांजाची वाहतुक होणार आहे. अशी बातमी मिळालेने त्यांनी पो. नि. विजय पाटील, स. फी. सपाटे, पो, हवा. महेश लावंड, असिफ ...

बाजार समितीचा 'तो' रस्ता सुरू केल्याने मार्केट यार्ड आतील व्यापाऱ्यांनी घेतला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय...

Image
बाजार समितीचा 'तो' रस्ता सुरू केल्याने मार्केट यार्ड आतील व्यापाऱ्यांनी घेतला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय... कराड दि. 7 (प्रतिनिधी) गेली काही दिवस बाजार समितीच्या संरक्षण भिंतीवरून सुरू असलेल्या प्रकाराबाबत न्यायालयीन आलेल्या आदेशानंतर नगरपालिकेने केलेल्या कारवाईवर झालेल्या गोंधळानंतर हा विषय जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात गेला असला तरी आता कराड मार्केट यार्ड मर्चंट असोशियन तर्फे शेती उत्पन्न बाजार समितीला हा रस्ता खुला केल्याने होणाऱ्या नुकसानीबाबत  निवेदन देण्यात आले असून खुला केलेला रस्ता बंद करण्यात यावा यासाठी असोशियन तर्फे मार्केट यार्ड मधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा  निर्णय घेण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सदरच्या निवेदनाने आपणास विनंतीपुर्वक कळवितो की उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची आम्हास कल्पना मिळालेली असून सदरच्या निर्णयाचे कोणतेही उलंघन करावे अशी आमची इच्छा नाही. परंतु सदरच्या निर्णयाने खुल्या होणान्या रस्त्यामुळे आम्हा सर्व व्यापार करणान्या व्यापारी लोकांना जो त्रास होणार आहे. ...

आजपर्यंत अन्नत्याग आंदोलन आता पाणीत्याग आंदोलनाचा इशारा : कराडमध्ये समतापर्वचे उपोषण...

Image
आजपर्यंत अन्नत्याग आंदोलन आता पाणीत्याग आंदोलनाचा इशारा : कराडमध्ये समतापर्वचे उपोषण... कराड दि.6-: मुस्लिम समाजाला एक सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. ॲट्रॉसिटी सारखा कायदा मुस्लिम समाजाला मिळावा. आजपर्यंत मुस्लिम समाज कधीही रस्त्यावर आलेला नव्हता. परंतु, आज केवळ पुरुष नव्हे तर मुस्लिम समाजातील महिला सुद्धा रस्त्यावर उतरत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन भेट घेणे गरजेचे होतं, मात्र अद्याप त्यांनी भेट का घेतली नाही हे आम्हाला समजले नाही. येत्या दोन दिवसात आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र स्वरूपाचे केले जाईल. आजपर्यंत आम्ही अन्नत्याग केला होता, आता पाणी त्याग केला जाईल. यापुढे हे आंदोलन आक्रमकरित्या केले जाईल आणि जे काही होईल त्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा जावेद नायकवाडी यांनी दिला आहे. अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून समतापर्व संयोजन समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. आज सातारा जिल्ह्यातील परजिल्ह्यातील मुस्लिम तसेच इतर समाजातील नागरिकांनी या आंदोलन...

मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा करावा : आ. बाळासाहेब पाटील...

Image
  मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा करावा : आ. बाळासाहेब पाटील... कराड तहसील कार्यालया समोरील उपोषणाला आ. पाटील यांची भेट... कराड दि .6-: कराड ते विविध संघटनांनी उपोषण सुरू केला आहे. या उपोषणाच्या द्वारे सुप्रीम कोर्टाने जे मुस्लीम समाजाच आरक्षण रद्द केले ते परत मिळावं. त्यासाठी पुन्हा कायदा करावा, याबाबत विधिमंडळात वारंवार चर्चा होत आली आहे. अलीकडे अल्पसंख्याक समाजाला विशेषःता टार्गेट केले जात आहे आणि त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या सर्व घटनांमुळे समाजामध्ये असुरक्षितेची भावना मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. तेव्हा त्यावर कायदा व्हावा, अशा प्रकारची मागणी या उपोषणकर्त्यांकडून केली जात आहे. शासनाने या मागण्यांची नोंद घ्यावी, अशी मी विनंती करतो. खरं तर शासनातील लोकांनी या आंदोलनाची दखल घेणे गरजेचे होते. परंतु अद्याप तसे काही झाले नाही. परंतु, येत्या काळात राज्य शासन या आंदोलनाची दखल घेईल, अशी अपेक्षा माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार...

'कृष्णा नर्सिंग’च्या 60विद्यार्थीनींची मुंबईच्या अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड...

Image
कराड : कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्य कॅम्पस इंटरव्ह्यूचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या सरव्यवस्थापक हवोवी फौजदार. डावीकडून डॉ. मंदार माळवदे, अनोरा बाप्टिस्टा, डॉ. वैशाली मोहिते... 'कृष्णा नर्सिंग’च्या 60विद्यार्थीनींची मुंबईच्या अंबानी हॉस्पिटलमध्ये निवड... कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरीची सुवर्णसंधी... कराड दि.6: येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील ६० विद्यार्थीनींना मुंबईतील सुप्रसिद्ध कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या विद्यार्थीनींना नोकरीची संधी मिळाली आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या सरव्यवस्थापक हवोवी फौजदार, मनुष्यबळ अधिकारी अनोरा बाप्टिस्टा विशेष उपस्थित होत्या. प्रारंभी कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नर्सिंग पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या ६...

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला...

Image
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला... कराड दि 4-समता पर्व संयोजन समिती वतीने कराड प्रशासकीय कार्यालय समोर काल पासून अल्पसंख्याक संरक्षण व आरक्षण आदी विविध मागण्यांसाठी भारतीय संविधान घेऊन समता पर्वचे नवाजबाबा सुतार, आनंदराव लादे, सलीम पटेल, जावेद नायकवडी, कय्युम मुल्ला, रमजान मांगलेकर, हनीफ मुल्ला, जुबेर पटेल, शोहेब संदे भूषण पाटील, धीरज जाधव, दिपक बाटे आदी समविचारी समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. आज उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते  व नगरसेवक इंद्रजित गुजर (कॅप्टन) कराड शहर प्रमुख शशीराज करपे, कराड शहर उपप्र‌मुख शेखर बर्गे, जिल्हापरीषद उपप्रमुख अमोल कणसे, सरपंच सतीश पालुवाडे राजकुमार पाटील, राकेश पवार - सामाजिक कार्यकते अध्यक्ष सुपन निरज सावंत, शिवसैनीक व इतर शिवसैनिक उपस्थित होते. यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरे नेहमीच दलित मुस्लिम समाजाच्या बरोबर आहेत. सरकार लोकशाही गोठण्याचा क...

सातारा- जिल्हा विकास आराखडामध्ये होणार नागरिकांच्या सूचनांचा समावेश...

Image
सातारा- जिल्हा विकास आराखडामध्ये होणार नागरिकांच्या सूचनांचा समावेश... सातारा दि.4-विकसित भारतासाठी सन २०२७-२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर पर्यंत पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ठ आहे त्यानुसार परकीय गुंतवणूक, देशाचे सकल उत्पन्न, शाश्वत विकास हि उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यासाठी बॉटम-अप दृष्टीकोनातून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासंबंधी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी धोरणात्मक नियोजन व अंमलबजावणी आराखडा जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येत आहे. सदर आराखडा मध्ये प्राथमिक क्षेत्र - कृषी आणि संलग्न सेवा , द्वितीय क्षेत्र - उद्योग व उत्पादन,   आणि तृतीय क्षेत्र – ऊर्जा, पायाभूत सुविधा, जलसंधारण, पर्यटन व इतर विविध क्षेत्रांच्या वाढीसाठी आवश्यक बाबींचा विचार करण्यात येत आहे.  याचप्रमाणे शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी आराखड्यामध्ये लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा बनविण्याकरिता जनता, लोकप्रतिनिधी , प्रशासन, तज्ञ यांच्या सूचनांचा समावेश करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने नागरि...

कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी पुन्हा शंकर खंदारेच....

Image
  कराडला पुन्हा मुख्याधिकारीपदी शंकर खंदारे; आठ दिवसांनी कराडला झाले हजर.... राजू सनदी कराड  कराड दि.4 (प्रतिनिधी) कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे पुन्हा येणार येणार म्हणून गेली महिनाभर सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे यांना रुजू होण्याचे आदेश कराडला आठ दिवसापूर्वी प्राप्त झाले होते. खंदारे अकोला नगरपरिषदेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते. अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती झालेला अधिकारी पुन्हा मुख्याधिकारी पदावर येतो आणि तेही कराडातच याची मात्र चर्चा सुरू झाली आहे. 27 सप्टेंबर रोजी चार्ज घेण्याच्या आदेश दिल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी खंदारे यांनी कराड मुख्याधिकारी पदाचा आज चार्ज घेतला आहे. कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी पहिल्यांदा जूनमध्ये शंकर खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी पदाचा चार्ज ही स्वीकारला. त्यानंतर दुसऱ्याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये त्यांची पदोन्नती झाली. या पदोन्नतीनुसार त्यांची अकोला महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाल्याची आदेश काढण्यात ...

कराडला स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत 14 वार्डात साडेतीन टन कचरा संकलन...

Image
कराडला स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत 14 वार्डात साडेतीन टन कचरा संकलन... कराड दि.1 (प्रतिनिधी) इंडियन स्वच्छता लीग.2.0, स्वच्छतेचा पंधरावडा आणि स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे येऊन त्यांना 'स्वच्छांजली' अर्पण करण्यासाठी आज शहरातील 14 वार्डात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात साडेतीन टन कचरा संकलित करण्यात आला. या अभियानात प्रांताधिकारी, तहसीलदार व पालिकेचे अधिकारीही सहभागी झाले होते. नगरपालिकेचे अधिकारी तसेच त्या त्या वार्डातील नागरिकांच्या नेतृत्वाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याअनुषंगाने वॉर्ड 1 - महादेव मंदिर वाखान,वॉर्ड 2 - छत्रपती शिवाजी उद्यान परिसर,वॉर्ड 3 - संतसखू मंदिर, वॉर्ड 4 - स्मशानभूमी, वॉर्ड 5 - सोमवार पेठ पाण्याची टाकी, वॉर्ड 6 - प्रीतिसंगम घाट,वॉर्ड 7 - रविवार पेठ पाण्याची टाकी, वॉर्ड 8 महात्मा फुले चौक, वॉर्ड 9 - कोयनेश्वर मंदिर,वॉर्ड 10 - कोर्ट परिसर, वॉर्ड 11 - छत्रपती संभाजी भाजी मार्केट, वॉर्ड 12- पी. डी. पाटील उद्यान, वॉर्ड 13 - बर्गे वस्ती, वॉर्ड 14 - ऑलिम्पिक...