कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून बोगस नंबरप्लेटची चोरीची बुलेट ताब्यात...
कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडून बोगस नंबरप्लेटची चोरीची बुलेट ताब्यात...
कराड दि.28- शहरात नियमित वाहतूकीच्या कामासंदर्भात कामकाज सुरू असताना संशयस्पद आढळून आलेल्या मोटरसायकलची चौकशी केली असता संबंधित मोटरसायकल चोरीची निघाली असून त्या संदर्भात कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवालदार अमोल तातोबा पवार यांना तसेच होमगार्ड जंगम यांना शुक्रवारी कराड शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमण्यात आले होते. सदर वेळी वाहतूक नियमन व वाहन चेकिंग करीत असताना संबंधित अमलदार यांनी समोरून येणारे ब्लॅक कलरची बुलेट वरील चालक यांना इशारा करून बाजूला घेतले, सदर चालकास त्याचे नांव व बुलेट बद्दल, तसेच तिचे कागदपत्राबाबत माहिती विचारली असता सदर चालक याने आपले नाव सलीम ईलाही डांगे वय 48 वर्षे, व्यवसाय वाहन खरेदी-विक्री रा. मसुर, जि सातारा असे सांगून बुलेटबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यामुळे बुलेट चारीची असावी असा संशय निर्माण झालेमुळे सदर बुलेट बाबत आरटीओ कार्यालय, कराड येथून पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली असता, सदर बुलेटचा मूळ क्रमांक एम एच. 12 एम. डी. 0044 असा व बुलेटचे मूळ मालक निवृत्ती साहेबराव सुर्वे असल्याची माहिती मिळाली होती. अधिक माहिती घेता सदरची बुलेट चोरीची असून त्याबाबत फलटण शहर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे संशयीताला त्याच्याकडील बुलेट शसह पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पुढील योग्य ती कार्यवाहीसाठी फलटण शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्यात आलेला आहे.

Comments
Post a Comment