कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची धडक कारवाई;6 किलो गांजा जप्त...
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची धडक कारवाई;6 किलो गांजा जप्त...
कराड दि.7 (प्रतिनिधी) कराड उप विभागीय पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री पुणे बेंगलोर महामार्गावर नारायणवाडी गावच्या हद्दीत इस्लामपूर बाजू कडून सहा किलो गांजा घेऊन येणाऱ्यास सापळा रचून पकडण्यात आल्याची घटना घडली आहे याप्रकरणी एक्टिवासह 6 किलो गांजा असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करून एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हयामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक प्रभावी कामगिरी करणेबाबत वरिष्ठाकडून सुचना केले आहेत. त्यानुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिलेल्या आहेत.
कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इस्लामपुर येथून एक गाडी हायवे वरुन कराड बाजुकडे येणार आहे. तरी सदर होन्डा अॅक्टिवा गाडी नंबर एम. एच. १० डी. एस. ८६६० असा असुन त्यावरून गांजाची वाहतुक होणार आहे. अशी बातमी मिळालेने त्यांनी पो. नि. विजय पाटील, स. फी. सपाटे, पो, हवा. महेश लावंड, असिफ जमादार, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, तानाजी बागल, पो. कॉ. अनिकेत पवार यांना बोलावून घेवून बातमीचा आशय सांगून छापा कारवाई करणेबाबत सुचना केल्या. त्याप्रमाणे महामार्गावर नारायणवाडी गावचे हददीतील प्रणव वाईन शॉपचे समोर सव्हिस रोडवर पो नि विजय पाटील यांनी पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना छाप्याचे वेळी कोणी काय करायचे याबाबत सुचना देवून आजु बाजूस दबा धरला.
शुक्रवारी रात्रौ ८.१५ वा. चे. दरम्यान एक पांढरे रंगाची होन्डा अॅक्टिवा कंपनीचे मोटार सायकल एम. एच. १० डी. एस. ८६६० वरुन एक इसम इस्लामपुर बाजुकडून सर्विस रोडने कराडकडे येताना दिसला. सदर मोटार सायकल ही बातमीतील माहितीनुसार असल्याने आम्ही सर्वजण सदर मोटार सायकलचे दिशेने येवून मोटार सायकलला घेराव घातला. सदर मोटार सायकल चालक याच्याकडे चौकशी करता त्याने त्याचे नाव अक्षय महादेव नलवडे वय २७ वर्षे, रा. साखराळे ता. वाळवा जि. सांगली असे सांगीतले. सदर अॅक्टीव्हा मोटार सायकलचे मधील मोकळ्या जागेमध्ये एक पांढरे रंगाचे पोते दिसून आले. त्या पोत्यामध्ये गांजा असल्याचे सांगीतले. सदर आरोपी अक्षय महादेव नलवडे वय २७ वर्षे, रा. साखराळे ता. वाळवा जि. सांगली याचे ताब्यात १,२०,०००/- रु. किंमतीचा गांजा तसेच ५०,०००/- रु. किं. मोटर सायकल असा एकूण १,७०,०००/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील स. फो. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, तानाजी बागल, पो. कॉ. अनिकेत पवार, गणेश बाकले, म. पो. ना. दिपाली पाटील यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment