सातारा- जिल्हा विकास आराखडामध्ये होणार नागरिकांच्या सूचनांचा समावेश...


सातारा- जिल्हा विकास आराखडामध्ये होणार नागरिकांच्या सूचनांचा समावेश...

सातारा दि.4-विकसित भारतासाठी सन २०२७-२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर पर्यंत पोहोचविण्याचे शासनाचे उद्दिष्ठ आहे त्यानुसार परकीय गुंतवणूक, देशाचे सकल उत्पन्न, शाश्वत विकास हि उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यासाठी बॉटम-अप दृष्टीकोनातून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासंबंधी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी धोरणात्मक नियोजन व अंमलबजावणी आराखडा जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येत आहे. सदर आराखडा मध्ये प्राथमिक क्षेत्र - कृषी आणि संलग्न सेवा , द्वितीय क्षेत्र - उद्योग व उत्पादन,   आणि तृतीय क्षेत्र – ऊर्जा, पायाभूत सुविधा, जलसंधारण, पर्यटन व इतर विविध क्षेत्रांच्या वाढीसाठी आवश्यक बाबींचा विचार करण्यात येत आहे.  याचप्रमाणे शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी आराखड्यामध्ये लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा बनविण्याकरिता जनता, लोकप्रतिनिधी , प्रशासन, तज्ञ यांच्या सूचनांचा समावेश करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या संकल्पना व सूचना जाणून घेण्याकरिता ऑनलाइन गुगल फॉर्म द्वारे  प्रतिक्रिया देण्याची सोय केलेली आहे, तसेच नागरिकांना आपल्या सूचना जिल्हा  नियोजन समिती कार्यालयास  Email- dpcsatara@gmail.com अथवा पत्राद्वारे ही दि. ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कळविता येईल.

 जिल्हाचे सकल उत्पन्न वाढ, क्षेत्रनिहाय उद्योग वाढ होण्याकरीता आणि एकूणच विकास होण्यासाठी नागरिकांनी विविध क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे योगदान देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गुगल फॉर्म लिंक

https://forms.gle/NZbzxqzRy7jzPufb7


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक