कराड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; 6 मोटार सायकली जप्त, दोघांना अटक....
कराड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; 6 मोटार सायकली जप्त, दोघांना अटक....
राजू सनदी कराड टुडे न्यूज नेटवर्क
कराड दि.21-पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे व डीबी पथकाने दोन मोटर सायकल चोराच्या मुसक्या आवळत एकुण 6 मोटर सायकल जप्त करुन 2,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व पथक यांनी त्यांचे कौशल्य पुर्ण तपासाचे जोरावर तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराचे मदतीने दोन संशयीत इसमांना नागठाणे येथुन ताब्यात घेतले. त्यातील एक इसम हा सातारा जिल्यातील तडीपार व दुसरा सराईत मोटर सायकल चोर असतांना देखील पोलीस उप निरीक्षक डांगे यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन आरोपीना बोलते केले. सदर कारवाईत आरोपी कडुन कराड शहर पोलीस ठाणेचे हद्दीतील विविध भागातुन चोरी झालेल्या मोटर सायकल चोरीचे सहा गुन्हे उघड करण्यात आले आहेत. नमुद गुन्हयात आरोपी जय अशोक सांळुखे रा. नागठाणे ता.जि. सातारा व अषिश बन्सीराम साळुंखे रा. नागठाणे ता. जि. सातारा यांना अटक करण्यात आली असुन त्यांचे कडुन एकुण 2,40,000/- रुपये किंमतीच्या एकुण 06 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहे.
पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे यांनी चार्ज घेतले पासुन वपोनि प्रदिप सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आर.एल.डांगे व डीबी पथकाने अवघ्या 4 महीण्यात एकुण 19 +03 मोटर सायकलचा शोध घेवुन सांगली सातारा जिल्हयातुन 9 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उप निरीक्षक डांगे, 'सफी रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment