उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांची अंमली पदार्थ धंदयावर धडक कारवाई...
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कराड यांची अंमली पदार्थ धंदयावर धडक कारवाई...
कराड तालुक्यातील म्होप्रे येथे गांजाची लागवड; सव्वा लाखाचा गांजा जप्त...
राजू सनदी कराड टुडे न्यूज नेटवर्क
कराड दि.21- सातारा जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक प्रभावी कामगिरी करणेबाबत वरिष्ठांनी सुचना केल्या आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना देऊन मिळालेल्या माहितीवरून म्होप्रे ता. कराड येथून ५ गांजाच्या झाडासहीत ११.८७० कि. ग्रॅ. वजनाचा १,२६,९२०/- रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. तर एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांना बातमीदारा मार्फत दि. २०/१०/२०२३ रोजी बातमी मिळाली की, म्होप्रे ता. कराड येथील सोमनाथ पांडुरंग जाधव याने म्होप्रे बेघर वसाहतीचे शेजारील त्याचे मालकीचे शेतात गांजा पिकाची लागवड केली आहे. अशी बातमी मिळालेने त्यांनी पो. नि. विजय पाटील, पोउनि राजेंद्र पुजारी, स. फौ. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, प्रविण पवार, धनजंय कोळी, समीर कदम, नितीन कुचेकर, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, पो. कॉ. अनिकेत पवार, प्रफुल्ल गाडे असे बोलावून घेवून बातमीचा आशय सांगून छापा कारवाई करणेबाबत सुचना केल्या त्याप्रमाणे मौजे म्होप्रे ता. कराड गावचे हददीतील बेघर वसाहतीचे शेजारील सोमनाथ जाधव याचे मालकीचे शेतात छापा पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी छापा कारवाई करुन ११. ०४८ कि. ग्रॅ. वजनाची ५ गांजाची झाडे तसेच आरोपीचे घरातून ०.८२२ ग्रॅम वजनाचा असा एकुण ११.८७० कि. ग्रॅ. वजनाचा १,२६,९२०/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांचे मार्गदर्शना खाली अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी, पो. नि. विजय पाटील, पोउनि राजेंद्र पुजारी, स. फौ. सपाटे, पो. हवा. महेश लावंड, असिफ जमादार, प्रविण पवार, धनजंय कोळी, समीर कदम, नितीन कुचेकर, उत्तम कोळी, गणेश वेदपाठक, पो. ना. सागर बर्गे, दिपक कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, पो. कॉ. अनिकेत पवार, प्रफुल्ल गाडे, म. पो. कॉ. जयश्री डोईफोडे यांनी केलेली आहे.

Comments
Post a Comment