कराडला स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत 14 वार्डात साडेतीन टन कचरा संकलन...
कराडला स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत 14 वार्डात साडेतीन टन कचरा संकलन...
कराड दि.1 (प्रतिनिधी) इंडियन स्वच्छता लीग.2.0, स्वच्छतेचा पंधरावडा आणि स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिक एकत्रितपणे येऊन त्यांना 'स्वच्छांजली' अर्पण करण्यासाठी आज शहरातील 14 वार्डात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात साडेतीन टन कचरा संकलित करण्यात आला. या अभियानात प्रांताधिकारी, तहसीलदार व पालिकेचे अधिकारीही सहभागी झाले होते.
नगरपालिकेचे अधिकारी तसेच त्या त्या वार्डातील नागरिकांच्या नेतृत्वाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याअनुषंगाने वॉर्ड 1 - महादेव मंदिर वाखान,वॉर्ड 2 - छत्रपती शिवाजी उद्यान परिसर,वॉर्ड 3 - संतसखू मंदिर, वॉर्ड 4 - स्मशानभूमी, वॉर्ड 5 - सोमवार पेठ पाण्याची टाकी, वॉर्ड 6 - प्रीतिसंगम घाट,वॉर्ड 7 - रविवार पेठ पाण्याची टाकी, वॉर्ड 8 महात्मा फुले चौक, वॉर्ड 9 - कोयनेश्वर मंदिर,वॉर्ड 10 - कोर्ट परिसर, वॉर्ड 11 - छत्रपती संभाजी भाजी मार्केट, वॉर्ड 12- पी. डी. पाटील उद्यान, वॉर्ड 13 - बर्गे वस्ती, वॉर्ड 14 - ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चौक कार्वे नाका या ठिकाणी आज शहरातील नागरिकांनी आपल्या वॉर्डमध्ये स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करून नगरपालिकेच्या आवाहनस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सदर स्वच्छते मधून सुमारे 3.5 टन कचरा गोळा करण्यात आला.
सदर अभियानासाठी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, उपमुख्यधिकारी विशाखा पवार, आरोग्य अभियंता आर. डी.भालदार, जलनिस्सारन अधिकारी ए.आर.पवार, आरोग्य अधिकारी मिलिंद शिंदे, सिटी कॉर्डिनेटर आशिष रोकडे, तसेच कराड नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील लोकप्रतिनिधी, विविध शाळा, सामाजिक संस्था, एनजीओ व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.



Comments
Post a Comment