कराड जवळ महामार्गावर कारची ट्रकला धडक;पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू...
कराड जवळ महामार्गावर कारची ट्रकला धडक;पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू...
कराड दि.14-(प्रतिनिधी) पुणे बेंगलोर महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून वॅगनर कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह तिघांचा समावेश आहे. हा भीषण अपघात आज शनिवारी दुपारी झाला आहे. या अपघातातील वॅगनर कार कोल्हापूरहून कराडच्या दिशेने येत होती.
नितीन बापूसाहेब पोवार-34 (रा. कोल्हापूर राजवाडा), मनीषा आप्पासाहेब जाधव-31 आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा . जरळी, ता. गडहिंग्लज, जि . कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती नुसार, पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा नजीकच्या हॉटेल भाग्यलक्षीनजीक महामार्गावर डाव्या बाजूला ट्रक उभा होता. साधारण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडून कराड कडे जाणाऱ्या वॅगनर कारने (क्र. एम. एच. 01 ए. एल. 5458) मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात कारमधील दोन पुरूष आणि एक महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असणारे कॉन्स्टेबल नितीन पोवार यांचा समावेश आहे.अन्य दोघे बहिण भाऊ आहेत. या अपघातीची नोंद कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये झाली असून घटनास्थळी महामार्ग पोलीस, कराड वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस, तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनची कर्मचारी घटनास्थळी दाखल होते.

Comments
Post a Comment